युवकांच्या भविष्याची क्रूर थट्टा करणारी केंद्राची अग्निपथ योजना तातडीने बंद करावी गोंडपिपरी तालुका काँग्रेसचे अग्नीपथ योजने विरोधात तहसील कार्यालयासमोर धरणे

युवकांच्या भविष्याची क्रूर थट्टा करणारी केंद्राची अग्निपथ योजना तातडीने बंद करावी

गोंडपिपरी तालुका काँग्रेसचे अग्नीपथ योजने विरोधात तहसील कार्यालयासमोर धरणे

युवकांच्या भविष्याची क्रूर थट्टा करणारी केंद्राची अग्निपथ योजना तातडीने बंद करावी गोंडपिपरी तालुका काँग्रेसचे अग्नीपथ योजने विरोधात तहसील कार्यालयासमोर धरणे

शरद कुकुडकार
गोंडपिपरी शहर प्रतिनीधी
मो.न.9518727596

गोंडपिपरी :- दिनांक २७ जून२०२२
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे मार्गदर्शनाखाली देशातील तरुणांचे भवितव्य धोक्यात आणणाऱ्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात दिनांक २७ जून २०२२ ला गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. व युवकांच्या भविष्याची कृर थट्टा करून पाहणाऱ्या केंद्राच्या अग्निपथ योजनेला तात्काळ बंद करावे असे निवेदन भारताचे महामहीम राष्ट्रपती महोदयांना तहसीलदारांमार्फत दिले.
भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने नुकतीच अग्नीपथ योजना जाहीर केलेली आहे. या योजनेमुळे देशातील तरुणांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात युवकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून संपूर्ण देशभर आंदोलने होत आहेत.
मोदी सरकारने दरवर्षी देशात दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पण रोजगार देण्याऐवजी अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. गेल्या काही वर्षात देशातील लाखो तरुणांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. मोदी सरकार दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याच्या भूमिकेवर बॅकफूटवर आलेली आहे. दुसरीकडे केवळ चार वर्षांसाठी रोजगार देऊन अग्नीपथ योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांची क्रूर थट्टा करीत आहे.
केंद्र सरकारच्या अग्निपथ विरोधात देशात संतापाचे वातावरण आहे. याचा निषेध करण्यासाठी लाखो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. तरुणांची ही भावना लक्षात घेता तातडीने अग्निपथ योजना बंद करून दरवर्षी दोन कोटी तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मोदी सरकारने द्यावा. असं निवेदन देत तहसील कार्यालयासमोर गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीने अग्निपथ योजने विरोधात निदर्शने केली.
निवेदना दरम्यान तुकाराम झाडे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी गोंडपिपरी, निलेश संगमवार कार्याध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी गोंडपिपरी, देवेंद्र बट्टे शहराध्यक्ष शहर काँग्रेस गोंडपिपरी, रेखाताई रामटेके महिला अध्यक्ष काँग्रेस कमिटी गोंडपिपरी, सविताताई बबलू कुडमेथे नगराध्यक्ष गोंडपिपरी, संतोष बंडावार तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस गोंडपिंपरी, विनोद नागापुरे अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती गोंडपिपरी, गौतम झाडे अध्यक्ष अनु. जाति. विभाग काँग्रेस कमिटी गोंडपिपरी, आशीर्वाद पिपरे उपाध्यक्ष अनु.जाती विभाग तालुका काँग्रेस कमिटी गोंडपिपरी,बालाजी चनकापुरे उपसरपंच दरुर, सचिन चिंतावार नगरसेवक गोंडपिपरी, अनिल झाडे नगरसेवक गोंडपिपरी, शारदाताई गरपल्लीवार नगरसेविका गोंडपिंपरी, बबलू कुडमेथे, शालू श्रीराम बावणे, विमलताई अरके, आस्वाद अवथरे, आदींनी निवेदन दिले.