आज काय घडलं पडद्याआड?

आज काय घडलं पडद्याआड?

आज काय घडलं पडद्याआड?
✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197

मुंबई : -मवीआ स्थापन होण्यापूर्वी देवेंद्रजीनीं ऊद्धव ठाकरे यांना बोलून प्रश्न सोडवता येईल का यासाठी 25 वेळा फोन केल्याचे आपल्याला मिडियातून वाचून कळले असेल,खुप नाही आज 2.5 वर्ष झाली,
काळ बदलला मवीआ सरकार तर जाईलच पण पक्ष ही एकनाथ शिंदे गटाच्या ताब्यात जायची वेळ आली,मग पक्ष बुड़ु नये म्हणून ऊद्धव ठाकरेंनीं सूरत मध्ये एकनाथ शिंदेची मनधरणी करण्यास मिलिंद नार्वेकर यांना पाठवले,नार्वेकर यांनी शिंदे व ठाकरे फोन वर बोलणी करून दिले,पण प्रकरण हाताबाहेर गेलेच,काल कोर्टाचा निकाल लागला अन ऊद्धव ठाकरेनां भाजप आठवला.

कोर्टाच्या आदेशानंतर सत्ता ही जाईल अन पक्ष ही जाईल अशी स्थिति अधिक प्रबळ झाली,मग उद्धव ठाकरेनीं संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांना फोन केला,राजनाथ सिंह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोला अस सांगून ठाकरेनां जागा दाखवली,थेट अमित शाह अन नरेंद्र मोदिनां फोन करावं तर कुठल्या तोंडाने करावं ही विवंचना खुप मोठी होती,शेवटचा प्रयत्न म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ऊद्धव ठाकरेनीं फोन केला,मनधरणी करून झाली अन देवेंद्रजीनी ही हात झटकले.

देवेंद्रजीनीं बोट दाखवल्यावर पुन्हा राजनाथसिंह यांच्या मध्यस्थीतून एका केंद्रीय नेत्यांचे पाय धरले,त्यांनी ही मधले बोट दाखवून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे पाठवले, मग ऊद्धव ठाकरेनीं जेपी नड्डा यांच्या ऑफिस मध्ये फोन केला,नड्डा यांच्या टेलिफोन ऑपरेटरने 10 मिनिटानीं फोन करा ते मीटिंग मध्ये आहेत त्यांच्याशी बोलून घेतो अस सांगितले,पुन्हा 10 मिनिटानीं ऊद्धव ठाकरेनीं फोन केला,जे पी नड्डा फोन वर न येता,टेलीफोन ऑपरेटरनींच सांगितले की नड्डा साहेब राष्ट्रपती निवडणूकित व्यस्त आहेत,अन राष्ट्रपति निवडणुक महत्त्वाची असून नड्डा यांना बोलायला वेळ नाही.

आवंढा गिळत भरल्या डोळ्यानीं गपगुमान फोन ठेवावा लागला,
आता बाहेर येऊन खंजीर,कोथळा,तलवार,अशी भाषा सभामधून वापरली जाईल पण ऊद्धव ठाकरेच्यां कायम लक्षात राहिल की नियती भयानक क्रूर असते,पण ही नवी भाजपा नियतीपेक्षा कमी क्रूर नाही,त्यासाठी सार्वजनिक जीवनात वावरताना जिभेवर साखर अन डोक्यावर बर्फाचा खड़ा ठेवून मार्गक्रमण करावं लागतं,अन्यथा तुमचा उद्धव ठाकरे होईल ही म्हण प्रचलित होऊ शकते अन होणार.