माणगाव पोलिसांची कामगिरी अवघ्या ४ तासात पीडित मुलीचा शोध करून दिलं पालकांच्या ताब्यात
✒दिपक दपके
माणगाव शहर प्रतिनिधी
9271723603📞
मिळालेल्या पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार दिनांक २८|०६|२०२२
रोजी माणगाव पोलीस ठाणे येथे सौ. मंगला संदीप वाघमारे वय – २८ वर्षे व्यवसाय मोलमजुरी रा. विठ्ठलवाडी, पो. रातवड, ता. माणगाव जि. रायगड या त्यांची मुलगी तेजश्री संदीप वाघमारे वय – १३ वर्षे हि दिनांक २७/०६/२०२२ रोजी दुपारी ०२.०० वाजता आम्हाला कोणालाही काहिएक न सांगता कोठेतरी निघुन गेली असलेबाबत तक्रार देणेकरीता आली असताना घटनेचे गांभीर्य ओळखुन सहा फौजदार कुवेसकर, पोना / १६२४ एम. एच. खिरिट, पोशि/ १३६१ शिंदे, पोशि/ १९०५ डोईफोडे, पोशि/ ४८८ पाटील यांनी तात्काळ गोपणीय माहितीच्या आधारे सदरची पिडीत मुलगी हि तिचे परीचयातील असलेला अर्जुन याचेसोबत त्याचे आंबेत कोकरे येथे असल्याची माहिती मिळवली व सदरची माहिती हि प्रभारी अधिकारी यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाने आंबेत कोकरे येथे जावुन पिडीत मुलगी हिला ताब्यात घेवुन माहिती प्राप्त झालेपासुन अवघ्या ४ तासांचे आत तिचे पालकांचे ताब्यात सुखरूप पणे दिले आहे.