चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक फौजदारासह पोलीस नाईक यांना ४००० हजाराची लाच स्वीकारताना अटक
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा :- जळगाव, जिल्ह्यातील
चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील
सहाय्यक फौजदारासह व पोलिस नाईक या
दोघांना ४ हजाराची लाच स्वीकारतांना
लाचलुचपत विभागाने यशस्वी सापळा रचून
पकडले असून या कारवाईने जळगाव जिल्ह्यात चांगलीच
खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांच्या मुलीने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे त्यांचे सासरच्या मंडळी विरुद्ध गु.र.न.०११३/२०२२ भादवी कलम ४९८अ व ईतर कलमानव्यये दिनांक १९ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचे कागदपत्रांमध्ये मदत करू असे सांगून चार्जशीट लवकरात लवकर पाठवून गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे अनिल रामचंद्र अहिरे सहाय्यक फौजदार नेमणूक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन आणि शैलेश आत्माराम पाटील वय 38 पोलीस नाईक नेम चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन वर्ग 3 राहणार चाळीसगाव तालुका चाळीसगाव यांनी पंचासमक्ष चार हजार रुपये लाचेची मागणी केली व शैलेश पाटील यांनी त्यास प्रोत्साहन दिले व सदर लाचेची रक्कम दोन्ही कर्मचारी हजर असताना अनिल आहिरे यांनी स्वतः चाळीसगाव शहरातील सिग्नल पॉईंट च्या एका चहाच्या टपरीवर पंचांसमक्ष स्वीकारले म्हणून या दोघांना रंगेहात पकडून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाई मुळे चाळीसगाव सह जळगाव जिह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे