वनविभागाकडून सागवान लाकडासह 2 चारचाकी वाहन जप्त

वनविभागाकडून सागवान लाकडासह 2 चारचाकी वाहन जप्त

वनविभागाकडून सागवान लाकडासह 2 चारचाकी वाहन जप्त

अमीतकुमार त्रिपटी
अहेरी उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9422891616

सिरोंचा : -दिनांक 27/06/2022 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 28/06/2022 रोजी श्रो श्रीनिवास म कटकु वनपरिक्षेत्र अधिकारी, सिरोंचा यांचे नेतृत्वात चितलपली नाका ते धर्मपुरी परिसरात वनकर्मचारी गस्त करीत असतांना मध्यरात्रीचे सुमारास 02.30 वाजता MH 12/DI 3069 हे वाहन चिंतलपल्ली नक्यावर आले असता सदर वाहनाला पाहुन नाक्यावर तैनात वनपान श्री आर. की. जवाजी समवेत श्री सुनिल कप्पलवार व इतर 3 यांनी सदर वाहनाची तपासणी करणेकरीता गेले असता सदर वाहन पलटवून परत धर्मपुरी नाक्याकडे जात होते तेव्हा नाक्यात कर्मचारी यांनी सदर वाहनाचा पाठलाग करीत गस्तीवरील कर्मचारी यांना माहिती दिली तेव्हा गस्तीवरील कर्मचान्यांना पाहून सदर वाहनातील वाहनचालक वाहन उभे करून समोर उभे असलेल्या वाहन क्रमांक TS-19/2347 मध्ये बसून फरार झाले तेव्हा वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात एकूण 8 नग साग लाकडे दिसुन आले, त्यानंतर गस्तीवरील अधिकारी कर्मचारी यांनी शासकीय वाहनाने चाहन क्रमांक TS-19/2347 चा पाठलाग केले असता सदर वाहन चितरेवला गावात उभे करून वाहना मधील सर्व आरोपी फरार झाले सदर वाहन ताब्यात घेवून ट्रॅक्टरद्वारे टोचन करून वनपरिक्षेत्र कार्यालय, सिरोंचा येथे आणण्यात आले. मोक्यावर जप्तीनामा, पंचनामा नोद करून एकूण साग नग ४, घनमीटर 0.901, रक्कम 65082/- व वाहनाची किमत 1500000/- असे एकुण 1565082/- किमतीचा माल जप्त करून सदर वाहन ताब्यात घेवून बाहन वनपरिक्षेत्र कार्यालय, सिरोंचा येथे आणून सदर बाबत • वनगुन्हा क्रमांक 08560/04/2022, दि. 28/06/2022 अन्वये भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 26(1), 41, 42(2) व 52 नुसार गुन्हा दाखल करुन पुढील चौकशी सुरु आहे.

सदर घटनेची कार्यवाही पुनम पाटे (भावसे,) उपवनसंरक्षक, सिरोंचा यांचे मार्गदर्शनात श्रीनिवास म. कटकू, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिरोंचा नेतृत्वात आर.व्ही नवानी, वनपाल, श्री ए.एच. गहाणे, वनपाल, श्री आर. चाय तलांडी, वनरक्षक श्री आर.एल आत्राम व रोजंदारी वनमजूर श्री सुनिल कप्पलवार, सारय्या संगेम, दुर्गेश जानकी यांनी पार पाडली असून पुढील चौकशी श्री श्रीनिवास म. कटकू, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिरांचा यांचे मार्गदर्शनाखाली श्री ए. एच. गहाणे, क्षेत्र सहाय्यक, सिरोंचा हे करीत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.