चाकूच्या धाकादा खऊन तीन कुटुंबांना लुटले पोलिस स्टेशनच्या डायरीत नोंद

चाकूच्या धाकादा खऊन तीन कुटुंबांना लुटले पोलिस स्टेशनच्या डायरीत नोंद

चाकूच्या धाकादा खऊन तीन कुटुंबांना लुटले पोलिस स्टेशनच्या डायरीत नोंद

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548📞

वाशीम : – वाशीम रिसोडफिर्यादीवरून धाक दाखवून तीन कुटुंबांना लुटल्याची घटना रोजी रात्री रिसोड तालुक्यातील गोभणी गावात घडली. गावातील रविनाथ गजानन खराटे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते गोभणी शेत शिवारात कोठ्यावर कुटुंबासह राहतात रात्री १२ वा ४ अज्ञात दरोडेखोर आले. आणि चाकूचा धाक दाखवून लाथा बुक्क्या मारून – सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५१ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. त्याच चोरट्यांनी शेजारी शांताबाई शंकर जाधव याचेकडील ३ हजार घेऊन पसार झाले. असलेल्या त्यानंतरही न थांबता दरोडेखोरांनी सूर्यभान मारुती राऊत यांच्या कोठ्यावर जाऊन त्यांना चाकूचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम •असा एकूण ४९ हजार २०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्याने पलायन केले. एकुण १ लाख ३ हजार ७०० किमतीचा माल घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अनेक शेतकरी त्यांच्या शेतात राहतात त्यांच्याकडे रोख रक्कम आणि दागिनेही असतात, त्यामुळे आता या घटनेनंतर ते प्रचंड घाबरले आहेत.✍