उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मुंबई, 29 जूनउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार अल्पमतात आले आहे आणि त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने राज्यपालांकडे केली. आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर उद्या गुरुवारी बहुमत सिद्ध करावे असा आदेश न्यायालयाने दिला. त्यानंतर आज रात्री दहा वाजता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.सुप्रिम कोर्टाने निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव यांनी फेसबुक लाईव्ह करत जनतेशी संवाद साधला, शिवसैनिक आणि बंडखोरांना भावनिक साद घालत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.