नवीन शैक्षणिक सत्राचे उत्साहात उदघाटन
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /वाशिम
आज नवीन शैक्षणिक सत्राचा उद्घाटन सोहळा आनंदात पार पडला. कार्यक्रमासाठी कारंजा चे तहसीलदार. धीरज मांजरे तसेच कारंजा पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी. श्रीकांत माने आवर्जून उपस्थित होते तसेच शाळेचे अध्यक्ष अशोक कुमार इन्नानी उपाध्यक्ष आनंद इन्नानी तसेच मुख्याध्यापिका संगीता परळीकर उपस्थित होत्या. शाळा प्रवेश उत्सववाच्या तयारीसाठी तहसिलदार धीरज मांजरे व गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी शिक्षकांचे कौतुक केले तसेच वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत केले. सोबतच शाळेच्या वतीने “वार्षिक नियोजन कॅलेंडर” छापण्यात आले आहे. त्याचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले या कॅलेंडर उपक्रमाचे सुद्धा मान्यवरांनी कौतुक केले व विद्यार्थ्यांना तसेच शाळेला नवीन शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा
दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन वैशाली ढगे यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना मयुरी चव्हाण यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे अध्यक्ष अशोक कुमार इन्नानी उपाध्यक्ष आनंद इन्नानी मुख्याध्यापिका संगीता परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी काम केले.✍