प्रवेशकर्त्या विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत व पुस्तके
वाटप
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /रिसोड
वाशीम : – एज्युकेशन सोसायटी द्वारा संच फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठम हाविद्यालय शाळेच्या इयत्ता पाचवी मध्ये नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी विद्यालयाचे उपप्राचार्य मनोज हांडे, पर्यवेक्षक गोपाल मुंधडा व मिडल स्कूलमधील सर्व शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या कामकाजाबद्दल, अभ्यासक्रमाबाबत, शिस्तबद्धते बाबत मार्गदर्शन करताना आले. सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे मिळणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले असल्याचे प्राचार्य यांनी माहिती दिली आहे.✍