शेतक-यांना 6% टक्के दराने कर्ज मिळण्यासाठी शासनाचे अर्थसाह्या
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /वाशिम
वाशीम जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीवरून जिल्ह्यात पीक कर्जवितरणाला गती द्यावी अशी माहिती पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी निर्गमित आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये शासनाने राज्यातील शेतक यांना ६ टक्के व्याजदराने अल्पमुदत पीक कर्जपुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतला असून, तसा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करतानाच जिल्ह्यात पीक कर्जवितरणाला गती द्यावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कर्जपुरवठ्याचे 1 हजार 400 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत खरीपाचे 66. 67 टक्के कर्जवितरण झाले असून, संपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वितरणाची प्रक्रिया गतीने होणे आवश्यक आहे. कर्जपुरवठ्याची प्रक्रिया राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून संथगतीने होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. राष्ट्रीयकृत व खासगी बँकांची कर्जवितरणाची टक्केवारी कमी असून, ती वाढविण्यासाठी मोहिम स्तरावर काम करावे. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी बांधव कर्ज मिळण्यापासून वंचित – राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पत्रकात नमूद केले आहे. या प्रयोजनासाठी एक टक्का व्याज फरकाची रक्कम शासन देणार आहे. या प्रयोजनासाठी निधीची तरतूद शासनाकडून करण्यात आलीआहे. राज्यभरातील शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होणार आहे.✍