सोयगाव पोलीस निरीक्षक श्री सुदामजी शिरसाठ यांची बदली.

सोयगाव पोलीस निरीक्षक श्री सुदामजी शिरसाठ यांची बदली.

सोयगाव पोलीस निरीक्षक श्री सुदामजी शिरसाठ यांची बदली.

तन्मय सुनिल जैन
7588165274

खाकी वर्दीतील एक सच्चा माणूस म्हणजे पोलीस सहायक सुदाम धर्मराज सिरसाठ साहेब… कोरोना काळात दुसऱ्या लाटे दरम्यान संपूर्ण देशभरात कोरोना रुग्ण वाढत असतांना सोयगाव शहरासह पोलीस हद्दीतील गावांमध्ये उन्हातान्हात रस्त्यावर -गावात जाऊन नागरिकांना खबरदारी घ्या म्हणून सांगणारा खाकी वर्दीतील माणूस, कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान गरजूंना किराणा वाटप करणारा खाकी वर्दीतील माणूस, अतिवृष्टीमध्ये रात्री-अपरात्री स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या मदतीसाठी धावणारा खाकी वर्दीतील माणूस, आपल्या कडे न्याय मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीला समजावून सांगणारा खाकी वर्दीतील माणूस…. असा हा खाकी वर्दीतील माणुसकीचा झरा वाहणारे आमचे सोयगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय सुदाम सिरसाठ साहेब यांच्या बदलीची माहिती मिळाली आणि मन सुन्न झाले… आपुलकी भावासारखा लावलेला जीव यामुळे साहेबांसोबत जिवाभावाचे नाते निर्माण झाले, संकटसमयी नेहमी धावून येणारी व्यक्ती म्हणजे सुदाम सिरसाठ साहेब ,रक्ताचे नाते नसले तरी आपलेपणाची जाणीव,जिव्हाळा निर्माण करणारे एक खाकी वर्दीतील व्यक्तिमत्व….
आशा व्यक्तिमत्वाला पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा…..
साहेब जिथे झालं तिथे आपण आपुलकीचे माणसे जोडाल……
आपण नेहमी प्रगती करत राहो एवढीच सदिच्छा 👏👏