महाराष्ट्र शासनाच्या कृषी संजीवनी मोहिम २०२२ अंतर्गत उद्योजिका स्नेहा दिपक कासार सन्मानित
*📰मीडिया वार्ता न्यूज📰*
*✍🏻संदिप जाबडे✍🏻*
*पोलादपूर तालुका प्रतिनिधी*
*संपर्क – 8149042267*
पोलादपूर(रायगड)- तालुक्यातील चरई गावच्या रहिवाशी असलेल्या स्नेहा दीपक कासार यांनी आपल्या पतीच्या सहकार्याने पोलादपूर शहरातील सैनिक नगर येथे स्नेहग्रो इंटरप्रायझेस या नावाच्या शुद्ध लाकडी घाण्याचे तेलाचा व्यवसाय सुरू केलाआहे.
लाडकी घाण्याचे शुद्ध तेल हे १००% नैसर्गिक पद्धतीने बनविले जात असल्याने तसेच अनेक प्राणघातक आजारांपासून दूर ठेवण्यात यशस्वी असल्याने लाकडी घाण्याचे तेल खरेदी करण्यासाठी लोकांची आवक वाढत चालली आहे. पोलादपूर सारख्या दुर्गम आणि ग्रामीण भागात त्यांनी केलेल्या कृषी विभागाच्या साहाय्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म व अन्न प्रक्रिया उद्योग विभागाच्या कृषी संजीवनी मोहीमे अंतर्गत अन्न प्रक्रियेशी संबंधित यशस्वी ठरलेल्या राज्यातील सहा महिलांचा सत्कार १ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तांच्या हस्ते कृषी आयुक्तालय पुणे येथे करण्यात आला. यामध्ये पोलादपूर तालुक्यातील उद्योजिका स्नेहा दीपक कासार यांना देखील गौरविण्यात आले. त्यांनी अगदी अल्पावधीत मिळविलेल्या यशाबद्दल पोलादपूर तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तर महिलांनी सूक्ष्म व लघु उद्योगांमध्ये लक्ष केंद्रित करून रोजगार निर्मितीसाठी प्राधान्य देण्याचे आवाहन स्नेहा दीपक कासार यांनी ग्रामीण भागातील महिलांना केले आहे.