टिप्पणी- विधानसभेतील मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाची

टिप्पणी- विधानसभेतील मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाची

टिप्पणी- विधानसभेतील मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाची

✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197

मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,
दिवस संपल्यानंतर आत्ता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकुन संपवलं. रोखठोक, इन्फॅार्मल, किस्से, चिमटे आणि कोपरखळ्यांनी युक्त भाषण. यशाला असलेली दुःखाची किनार सांगताना भावनिक होणं. मोकळेढाकळेपणा काहीसा अघळपघळपणाकडे झुकणारा! देवेंद्र फडणवीसांसारख्या माणसानंही हात टेकले! सर्वसामान्य नागरिकांवर पहिल्याच भाषणात पुरेपूर छाप पाडली आहे एकनाथ शिंदेंच्या भाषणानं. असं असलं तरी – लिखापढी करण्यात वेळ जातो. मी डायरेक्ट कलेक्टरला आदेश देणार – किंवा – भाजपला निधी देताना जरा हात आखडता होता कारण माझ्याकडे लक्ष होतं यासारखी विधानं – यापुढे चिंता नको, बॅकलॅाग भरुन काढेन म्हणणं – या गोष्टी सूचक आहेत. अत्यंत महत्त्वाचं वाक्य – भाजीवाले, चहावाले, रिक्षावाले म्हणुन हिणवलं पण सर्वसामान्य माणुस मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? होऊ शकतो. सरकार त्यांचंच! वाक्य भाषणात म्हणुन छान आहे पण प्रत्यक्षात सर्वसामान्य माणुस एखाद्या ‘महाशक्ती’ च्या पाठिंब्याशिवाय खरंच मुख्यमंत्री होऊ शकतो का हे नागरिक जाणतात. एकनाथ शिंदेंनीही हे लक्षात ठेवावं. कार्यकर्ता ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास खडतर असेलच, त्याबद्दल शंका नाही. पण सतत ‘तुम्ही आम्ही काही वेगळे नाही’ हे विरोधकांना म्हणणं खुपच कॅज्युअल ॲप्रोच दाखवतं. हा ॲप्रोच काही फारसा पटला नाही. भाषणभर उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रॅाम्प्टिंग सुरु होतं. ते बघता सरकारचा कारभार कसा होणार आहे याची झलक दिसतेच आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर बदललेली बॅाडी लॅंग्वेज, आत्मविश्वास, ताण हलका झाल्याची भावना शिंदे-फडणवीस जोडगोळीच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकते आहे. मोदी साहेब, शहा साहेब आणि नड्डा साहेब यांच्याबद्दल ओसंडणारं कौतुकही लक्षात येण्यासारखं आहे. सर्वसामान्यांचं सरकार असेल असं एकनाथ शिंदे म्हणताहेत. ते खरंच किती सर्वसामान्यांचं आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. तोपर्यंत मीडिया वार्ता न्यूज तर्फे एकनाथ शिंदेना मनःपूर्वक शुभेच्छा!