निमजी ग्रामपंचायतचा मनमानी कारभार
नरेगाच्या कामा मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. |
नकली कामगार दाखवुन लूटले लाखो रुपये. |
नागपुर जिल्हा परिषद या प्रकरणावर खामोश. |
युवराज मेश्राम कळमेश्वर प्रतिनिधी
नागपुर:- जिल्हातील कळमेश्वर तालूक्यात येणा-या निमजी ग्रामपंचायत मध्ये ग्राम पंचायतचे सरपंच आणी सचिवांच्या मनमानी कारभारामुळे आज जनता मोठा प्रमाणावर त्रस्त आहे.
निमजी ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत सामाजिक वनीकरण व वनपरिक्षेत्र ग्रामपंचायतच्या योजने संदर्भात असलेल्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालीची माहिती पुढे येत आहे. गावातील ग्रामपंचायत सदस्य विनोद भोयर, माजी ग्रामपंचायत सदस्य हितेश उईके, ग्राम पंचायतचे माजी सरपंच मनोज चोरमोरे, योगेश भोयर व गावकरी नागरिक यांच्या मार्फत नागपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी नागपूर, खंड विकास अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर यांना अनेक दिवसापासून लेखी आणी तोंडी ग्रामपंचायत नीमजी येथील नरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या कामात अनेक टूटी आणी मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येत आहे.
रोजगार सेवक सरपंच व सचिव या तिघांनी मिळुन गावातील वनविभाग व सामाजिक वनीकरण च्या कामामध्ये कंपनी मध्ये नोकरीवर असणा-या लोकांनचे नाव टाकून शासनाचे लाखो रुपये हडप केल्याचा आरोप गावकरी करत आहे. रोजगार सेवक, सरपंच आणि सचिव यांनी गावातील नोकरीवर असलेल्या लोकांना ग्राम पंचायतच्या वनविभाग व सामाजिक वनीकरणच्या कामावर घेण्यात आले यामध्ये
१) रंजना राजेश गडशवर (मिन्यास)
२)प्रवीण अशोक भोयर सेक्युरिटी (डी आय एस कंपनी)
३)एकनाथ श्रीकृष्णा भोयर (डी पी जन कंपनी लिमिटेड )
४)मिथुन जागोखरे लॉजिस्टिक प्रा लिमिटेड
५)योगिता प्रकाश शिगन व इतर अनेक लाभार्ती कंपनी मध्ये नोकरी करत असून सुद्धा येथील सरपंच व सचिव यांनी रोजगार सेवक प्रकाश नारायण शिगन यांनी त्यांना 9 ते 10 वर्षपासून कामावर असून शासनांनी यांना अध्यक्ष केल यामुळे येथील ग्रामपंचायत या अदाधुंदी कारभार असल्यास दिसत आहे.
ग्रामपंचायत मध्ये हजारो रुपयाचा भष्टाचार झालाचे दिसत आहे या संदर्भातील अनेक तक्रारी गावकर्यांनी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी, खाद्यविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती यांना अनेकदा तक्रारी केल्या. परंतु अजून पर्यंत कुठलीही चौकशी झालेली नाही. तरी संबंधीत ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच व गावक-यानी दिलेलं माहिती करिता संबंधीत वन विभाग, सामाजिक वनीकरण अधिकाऱ्याचं चौकशी करून गावातील नागरिकयाना नाय मिळून द्या असलयाचे तक्रार गावकरी व ग्रामपंच्यात सदस्य यांनी केली. व संबंधीत्यावर कारवाही करण्याचे मागणी विनोद भोयर हितेश उईके मनोज चोरमारे माजी सरपंच योगेश भोयर आणी गावकरी नागरिक यांनी केली.