नागभीड येथे कृषिदूत प्रशिक्षण कार्यक्रम संपन
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड— शेतकऱ्यांच्या हितासाठी जैविक शेतीचे फायदे त्यांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल अशा विविध माहितीसाठी सत्यक्रांती बायो-ऍग्रो व्हिजन प्रा.ली. व हरितक्रांती बायो ऍग्रोटेक, नागपूर द्वारा रोजगार मार्गदर्शन कार्यशाळा नागभीड येथे महादेव मंदिर जवळ निसर्गयन मध्ये दिनांक ०३ जुलै ला आयोजित केले होते.या कार्यक्रमाचे उदघाटक विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडी चंद्रपूर विभागीय अध्यक्ष सुदामभाऊ राठोड, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सुरेश बलावार, मा.दुलसिंग राठोड प्रयोगशील शेतकरी व सेवानिवृत्त RTO अधिकारी नागपूर, सौ.जयश्री दुलशिंग राठोड संयोजिका विभक्त भटके महिला आघाडी पूर्व विदर्भ प्रांत, भाजपा महाराष्ट्र, मा.श्रीमती पर्वतीबाई राठोड महाराष्ट्र प्रदेश महिला पदाधिकारी सदस्य महिला काँग्रेस कमिटी तसेच या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून मा.श्रीपतभाऊ राठोड व जयश्रीताई राठोड सत्यक्रांती परिवार नागपूर उपस्थित होते,तसेच विशेष सादरीकरण म्हणून राष्ट्रीय सादरीकरण कर्त्या कुमारी दीपाली राठोड व अंजली राठोड.या कार्यक्रमाचे संयोजक श्री विश्वनाथ राऊत तर कार्यक्रम आयोजन सत्यक्रांती बायो ऍग्रोव्हिजन प्रा ली.व हरितक्रांती बायोऍग्रोटेक नागपूर यांच्या द्वारे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते व सर्व मान्यवराकडून लाख मोलाचं मार्गदर्शन या कार्यशाळेत शेतकरी बांधवाना मिळाला.