संभाव्य मंत्री आमदार भरतशेठ गोगावले व विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची चोळई दरडग्रस्त भागाला भेट !

संभाव्य मंत्री आमदार भरतशेठ गोगावले व विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची चोळई दरडग्रस्त भागाला भेट !

संभाव्य मंत्री आमदार भरतशेठ गोगावले व विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची चोळई दरडग्रस्त भागाला भेट !

📰मीडिया वार्ता न्यूज📰
✍🏻संदिप जाबडे✍🏻
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
संपर्क – 8149042267

पोलादपूर : -रायगड जिल्ह्यासह पोलादपूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच अनेक दरडग्रस्त गावे असल्याने व सोमवार रोजी चोळई येथे महामार्ग लगत दरड कोसळून कुटुंबे स्थलांतरित करावी लागल्याने या पार्श्वभूमीवर तातडीने विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी पोलादपूर येथे तातडीने धाव घेत येथील पूर परिस्थितीसह दरडग्रस्त विभागाची पाहणी केली.

गेले दोन ते तीन दिवस पोलादपूर मध्ये पावसाची संततधार चालूच असल्याने मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात चोळई गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून हनुमान मंदिराजवळील वीस घरांना धोका निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र व विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार भरतशेठ गोगावले यांनी तातडीने चोळई दरडग्रस्त भागाला भेट दिली .
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथील नागरिकांची म्हणणे ऐकून घेतले त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मोबाईल द्वारे संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या यावेळी ग्रामस्थांनी गेली दोन वर्ष आम्ही संरक्षक भिंतीची मागणी करत असताना सुद्धा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने सदर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले तसेच आम्ही पावसाळ्यामध्ये जीव मुठीत धरून येथे राहत असल्याचे सांगितले.
आमचा बुरुड व्यवसाय असून त्या व्यवसायावरच आमचे उपजीविका असल्याने आम्ही स्थलांतरित होऊन जर राहायचं म्हटलं तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल ही बाबही त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले ह्या सर्व गोष्टीचा विचार करून रायगड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्याशी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तातडीने चर्चा करून सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या या अगोदर महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी बहुमत चाचणी झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात आल्यानंतर चोळई दरड ग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांना धीर दिला त्यांनी तहसीलदार दिप्ती देसाई यांना योग्य ते उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या व एल अँड टी च्या ठेकेदारांना तातडीने दरड बाजूला करून संरक्षक भिंत लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या यावेळी ग्रामस्थांनी एल अँड टी कंपनीच्या नियोजन शून्य कामाबाबत तक्रारी केल्या ग्रामस्थांचं कोणतंही म्हणणं किंवा निवेदन राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार विचारात घेत नाहीत आमचा जीव गेल्यानंतर प्रशासन आमच्याकडे लक्ष देणार का असं सवाल चोळई गावचे ज्येष्ठ नागरिक हनुमंत गायकवाड यांनी आमदारांशी बोलताना केला. आम्हाला न्याय मिळावा व तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आमदारांकडे ग्रामस्थांनी केली संबंधित अधिकाऱ्यांना आमदार भरतशेठ गोगावले यांनी सूचना केल्या व तातडीने उपायोजना हाती घ्याव्या म्हणून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला ताकीद दिली दरम्यान मुंबई गोवा महामार्ग पोलादपूर शहरापासून कशेडी घाटापर्यंत जे काम चालू आहे ते नियोजन शून्य असून वेळोवेळी तक्रारी करूनही त्यामध्ये सुधारणा होत नसल्याचे पत्रकार यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार भरतशेठ गोगावले यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, तहसीलदार दिप्ती देसाई, नायब तहसीलदार समीर देसाई, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.