बाळांना घरोघरी औषधाचे वाटप
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
अतिसार नियंत्रण पधरवड्यास सुरुवात,
ग्रामीण मुखवटा असलेल्या तालुक्यातील सर्व वाडी वस्त्या, तांडे, गावातील लहान बाळांचे आरोग्य सुदृढ राहावे, या दृष्टीने आरोग्य प्रशासनाकडून १ ते १५ जुलैदरम्यान अतिसार पंधरवड्याचे नियोजन करण्यात आले नियंत्रण आहे. मानोरा शहर आणि तालुक्यातील नागरिकांची एकूण संख्या दीड लाखांच्या वर असून, बहुतांश कुटुंबात लहान बालके आहेत. जून, जुलै व ऑगस्ट या पावसाळ्याच्या महिन्यांत दूषित पाणी पेयजल म्हणून वापरात येऊन लहान बाळांना अतिसाराची लागण होण्याची संभावना बळावलेली असते. लहान बाळांना अतिसाराची लागण होऊ नये यासाठी आरोग्य प्रशासनाकडून प्रत्येक घरामध्ये जाऊन देण्यात येत असलेली ओआरएस पावडर ही एक लिटर पाण्यात उकळूनघेऊन हे पावडरमिश्रित पाणी बाळांना देण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना ओआरएस पावडर आणि झिंक गोळ्यांचे वाटप केले जात आहे. आरोग्य विभागाबरोबरच महिला व बाल कल्याण विभाग, शिक्षण, पाणीपुरवठा विभाग यांच्या समन्वयाने आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकाआणि आरोग्य कर्मचारी हे प्रत्येक गावातील घरोघरी भेट देऊन ओआरएस पावडर आणि १४ दिवसांच्या झिंक गोळ्या वयोमानानुसार बालकांच्या पालकांना देत आहेत.✍