महामार्गावर ट्रक उलटला सुदैवाने जीवितहानी नाही
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशीम : – राष्ट्रीय महामार्गावर मधापुरी फाट्यानजीक रमण्यात नवीन बांधकाम झालेल्या पुलावरून ट्रक उसळून स्टेरिंग लाक झाल्याने चालकाचे वाहना वरून नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक बाजूला जावून उलटल्याची घटना घडली. बिहार राज्यातील पटना येथून एमआयडीसीत शेतीच्या तणावर फवारणी करण्यात येणारी औषधी राउंडअपचे बाक्स भरून चालक सतीश शेप वय २८ रा. फावडेवाडी ता. रेणापूर जि. लातूर हा ट्रक क्र. एमएच २४ ऐ यु ४०७३ या वाहनाने जात असता राष्ट्रीय महामार्गाच्या पुलावरून वाहन उसळल्याने चालकाचे वाहनांवरून नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेत ट्रकमध्ये भरलेल्या बाक्समधील बाटल्या अस्तवस्त पडल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत, उपनिरीक्षक घनश्याम पाटील, सहायक उपनिरीक्षक दिलीप नागोलकर, जमादार नंदकिशोर टिकार, तेजराव तायडे वाहनचालक मनोहर इंगळे, पो का राजेश डोंगरे यांनी घटनास्थळी त्वरीत दाखल होवून ट्रक मधील बाक्स दुसऱ्या ट्रक मध्ये लोड करून अकोला येथे रवाना केला. याप्रकरणी माना पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.✍