अवैधरित्या वीट भट्टीसाठी माती उत्खन करणाऱ्याचे धाबे दणाणले,
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
कारंजा : – तहसिलदारांच्या कारवाईकडे लक्षकांरजा अमरावती मार्गावरील म्हसला फाट्यानजीक अनेक विटभट्टया असुन या विटभट्टयावर धरणातील काळ्या मातीचा विट निर्मीतीसाठी मागील काही दिवसांपासुन सर्रास वापर सुरू आहे. यासाठी धरणातील काळ्या मातीचा गाळ म्हणुन उपसा करून शेतात टाकत असल्याची नवी शक्कल विटभट्टी चालकाकडुन लढविल्या जात आहे. यासंदर्भात विनोद नंदागवळी पत्रकार तक्रार ची दखल घेऊन तक्रारीवरून तहसिलदार धीरज मांजरे यांनी चैकशीचे आदेश दिले त्यानुसार संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांनी स्थळ निरीक्षण करून संयुक्त अहवाल तहसिल कार्यालयाकडे सादर केला. यावेळी या परीसरतील बहुतांश विटभट्टयावर काळ्या मातीचा साठा केल्याचे दिसुन आले. यासदर्भात विटभट्टी चालकांकडुन रॉयल्टी भरल्याचे सांगीतल्या जात आहे. मात्र विटभट्टीसाठी धरणातील गाळरूपी काळ्या मातीची रॉयल्टी भरून घेतल्या जात नाही. त्यामुळे आता तहसिलदार सदर प्रकरणी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तहसिलदारंानी आपल्या आदेशात प्राप्त तक्रारीचा संदर्भ देत कांरजा नागझरी हायवे रोडवरील म्हसला गावाजवळ असणाÛया विटभट्टीवर अवैधरित्या माती उत्खनन व विटभट्टीसाठी लागणारे लाकुड हे अवैधरित्या आणत असल्यासंदर्भात चैकशी करून संयुक्त स्थळ निरीक्षण अहवाल सादर करावा असे म्हटले आहे. या परीसरातील बहुतांश विटभट्टयावर विट निर्मीतीसाठी काळ्या मातीचा वापर केल्या जात असुन अवैध वृक्षतोड करून विटभट्टी पेटविण्यासाठी लाकडाचा वापरही केल्या जात आहे. शिवाय या विटभट्टयांवर शासकिय नियमांना तिलांजली दिल्या जात असल्याने सदर प्रकरणी तहसिलदार महोदाय काय कारवाई करतात
याकडे या परीसरातील सर्वाचे लक्ष लागले आहे✍