अमरनाथ यात्रेसाठी २९ शिवभक्तांची दुसरी तुकडी मालेगावहून रवाना
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /मालेगांव
मालेगाव शहर व तहसील परिसरातील २९ भाविकांची दुसरी तुकडी आज अमरनाथ यात्रेसाठी स्थानिक जुन्या बसस्थानकाजवळील हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर दुपारी १२.३० च्या सुमारास रवाना झाली. हनुमान मंदिराजवळ या ग्रुपचे जंगी स्वागत करण्यात आले.
अमरनाथ यात्रेसाठी निघालेल्या या तुकडीत मालेगांव शहर व तालुक्यातील महादेवराव घुगे, डॉ.महेश घुगे, अनिकेत सारसकर, धीरज यादव, तन्मय यादव, करण यादव, उमेश ठाकूर, संतोष शर्मा, सुनील सोमाणी, अक्षय ढोले, आदी सह एकुण 29 शिवभक्तांचा समावेश आहे.
मालेगावच्या जुन्या बसस्थानकावर असलेल्या हनुमान मंदिरापासून ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. त्याठिकाणी येवता येथील संत शांतीपुरी महाराज, मनोज यादव, अभि घुगे, ऋषिकेश सारसकर, राजेंद्र लहाने, डॉ उमेश तारे आदी सह असंख्य लोकांनी अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंचे जंगी स्वागत करून त्यांना यात्रेकरिता शुभेच्छा दिल्या.
मालेगांव येथून दुपारी साडेबारा वाजता निघुन अमरनाथ यात्रेकरूंची ही तुकडी वाशिम रेल्वे स्टेशन पोहचून तेथून हुजूर साहेब नांदेड ते जम्मू तावी जाणाऱ्या जाट हमसफर एक्स्प्रेस ने दुपारी साधारण दोन वाजता जम्मू जाण्यासाठी प्रयाण करणार आहे. 9 जुलै च्या रात्री अकरा वाजता च्या सुमारास जम्मू पोहचल्यावर ही तुकडी 12 व 13 जुलै रोजी पवित्र अमरनाथ गुहेमध्ये शिवलिंगाचे दर्शन घेणार आहे.✍