आचार्य विद्यासागरजी यांच्या वर्षावासाच्या अनुषंगाने सेलू येथे स्वागत

आचार्य विद्यासागरजी यांच्या वर्षावासाच्या अनुषंगाने सेलू येथे स्वागत

आचार्य विद्यासागरजी यांच्या वर्षावासाच्या अनुषंगाने सेलू येथे स्वागत

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /शिरपूर

महामुनीराज 1008 आचार्य विद्यासागरजी महाराजांचा सन 2022 चा वर्षावास चार्तुमास मालेगांव तालुक्यातील शिरपूर (जैन) येथे 13 जुलैपासून सुरु होणार आहे.

आचार्य मुनी श्री 108 विद्यासागर महाराज यांचा शिरपूर जैन येथे चतुर्मास कार्यक्रम असल्याने त्यांचा शिरपूर येथे जाण्यासाठी मोर्शी, अमरावती, कारंजा, तऱ्हाळा, शेलुबाजार, मालेगाव मार्गे प्रवास सुरू आहे. जिल्हा वाहतुकचे ठाणेदार तायडे, पी. एस. आय. व 6 पोलीस कर्मचारी विद्यासागर महाराज यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा असल्यामुळे त्यांना चांगली सुरक्षा देण्यात आली होती. मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संतोष आघाव, व शेलुबाजार पोलीस चोकीचे कर्मचारी यांचा चोक बंदोबस्त होता. त्यांच्या दर्शनासाठी पंचकोशीतील नागरिकांची गर्दी जमली होती सर्वांना आशीर्वाद देत त्यांच्या आगमन मालेगाव कडे झाले. आचार्य विद्यासागरजी महाराजांचा निवास शिरपूर (जैन) येथील निकलंक भवन येथे राहणार आहे. आचार्य विद्यासागरजी महाराजांच्या दर्शनाकरीता मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे.✍