शिकारी करीता लावलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शने युवकाचा मृत्यु

शिकारी करीता लावलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शने युवकाचा मृत्यु

शिकारी करीता लावलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शने युवकाचा मृत्यु

अहेरी तालुका प्रतिनिधी
स्वप्निल श्रीरामवार 8806516351

अहेरी : – मागील तीन दिवसा पासून अहेरी तालुक्यात सतत मुसळधार पाऊस सुरु असुन काल दिनाक 9 शनिवार रोजी मृतक महेश वेलादी वय 17 वर्ष मासे पकड़न्या करिता नागेपल्ली ला लागून असलेल्या लक्ष्मण नाला असुन लक्ष्मण नाल्या पासून अंदाजे 500 मिटर अंतरावर वन परिक्षेत्र अहेरी अंतर्गत येत असलेल्या नागेपल्ली मधिल खंड क्रमांक 29 मध्ये शिकारी करीता लावलेल्या विद्युत तार ला स्पर्श झाल्याने महेश वेलादि हा युवक मासे पकड़न्या करित जात असताना विद्युत तार च्या स्पर्शने महेश वेलादी या युवकाचा जागिच मृत्यु झाला अशी माहिती पोलिस विभाग कडून मिळाली आहे, अज्ञान व्यक्ति विरुद्ध गुन्हा दाखल केल आहे अशी माहिती मिळाली सदर घटना ही काल सायंकाळी 7.30 ते 8.00 रात्र च्या दरम्यान उघड़ीस आली मृतक यूवक हा मुळ चा दामरचा या गावचा येथिल असुन अहेरी येते शिक्षण घेत होता अशी माहिती प्राप्त झाली

तर असे घडले नसते….

स्थानिक लोकाकडून वन विभाग वर नाराजगी व्यक्त केली जात आहे, नियत वनरक्षक वनकर्मचारी नियमित पणे जंगलात गस्त घालत नाही असे या प्रकारावरून निदर्शनास येते, अज्ञात व्यक्ति कडून शिकारी करीता विद्युत तार टाकून ठेवल्याने सदर गंभीर घटना घडली आहे, मागील चार दिवसा पासून अहेरी तालुक्यात सतत पाऊस सुरु असून पावसात वन्य प्राणी शिकार ही विद्युत तार लावून केली जात नाही, याचा अर्थ शिकारी करिता सदर तार हा निदान आठ दिवसापूर्वी लावला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे,
परंतु मागील 4 दिवसापासून सतत पाऊस सुरु असल्यामुळे शिकारी तिकडे भटकले नाही आणि 17 वर्षीय युवकाचा असा दुर्दैवी मृत्यु झाला, सदर वन कर्मचारी याना कॉल केला तर त्यांच्या कडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही, यावरून असे दिसून येते की वन कर्मचारी आणि वनरक्षक वरिष्ठ अधिकारी यांची दिशाभूल करित असून जंगलात गस्त करित नाही कारण घटनास्थळ हे आलापल्ली अहेरी या रहदारी च्या मुख्य मार्गापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे सदर नियत वनरक्षक यांचे वर तात्काळ कारवाई करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहे