आषाढी एकादशी निमित्त बनोटी गावात पालखी.

आषाढी एकादशी निमित्त बनोटी गावात पालखी.

आषाढी एकादशी निमित्त बनोटी गावात पालखी.

तन्मय सुनिल जैन
सोयगाव तालुका प्रतिनिधी
7588165274

आज बनोटी गावात सकाळपासून अविरत पाऊस सुरू असताना श्री विठ्ठलाची किमायच न्यारी याची प्रचिती आली. आपल्या तान्ह्या लेकरांना विठ्ठलाने आपल्या जवळ बोलावले नाही म्हणजे झाले.
आज बनोटी गावात श्री राम मंदिर येथून दुपारी 4 वाजता पालखीचे प्रस्थान झाले. त्याप्रसंगी गावातील प्रथम नागरिक आणि सरपंच श्री मुरली बापू ,पोलीस पाटील श्री धनराज सोनावणे , ह भ प पारस महाराज जैन यांच्यासह श्री अशोक वेहळे, नगराज पाटील,सुभाष चापरिया,राजु पाटील,तन्मय जैन,उदय खैरनार,तात्याराव चौधरी,शैलेश पाटील,समाधान खैरनार,रोहन जाधव यांच्यासह अनेक टाळकरी ,माळकरी,गायक वादक उपस्थित होते.
यावेळी अवघी नगरी ही प्रती पंढरपूर चे रुप वाटत होते. पालखीचा समारोप हे येथील प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे झाला. सर्वांनी पांडुरंग परमात्मा ची आरती करून दर्शनाचा लाभ घेतला.