माणगाव मौजे निळज /आदिवासी वाडी गावातील मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

माणगाव मौजे निळज /आदिवासी वाडी गावातील मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

माणगाव मौजे निळज /आदिवासी वाडी गावातील मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

✍ दिपक दपके ✍
माणगांव शहर प्रतिनिधी
मो, 9271723603

माणगाव तालुक्यातील मौजे निळज/ आदिवासी वाडी गावातील विमल प्रकाश हिलम, राहणार/ निळज आदिवासी वाडी माणगाव, व सुरेश बळीराम हिलम, राहणार /निळज आदिवासी वाडी, तालुका माणगाव, हे एकाच गावातील रहिवासी असून सुरेश बळीराम हिलम हा दारू पिऊन गावात येऊन कोणालाही काही कारण नसताना शिवीगाळ करत असत सदर आज दिनांक १० जुलै रोजी २१/०० वाजण्याच्या सुमारास निळज / आदिवासी वाडी येथे गावात मीटिंग चालू असताना निळज गावातील प्रकाश रामा हिलम व्यवसाय/ मोलमजुरी हा सुरेश हिलम याला बोलला की तू दारू पिऊन कोणालाही शिवीगाळ करू नको असे बोलल्याने व या गोष्टीचा राग आल्याने सुरेश बळीराम हिलम याने प्रकाश हीलम याला लाथा बुक्क्याने मारहाण करत असताना तेथे विमल प्रकाश हीलम राहणार निळज हे त्यांची भांडण सोडविण्याकरता गेले असता सुरेश हिलम याने विमल प्रकाश हिलम यांना आता बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करून व लाथ मारून जमिनीवर खाली पाडून हातातील काठी विमल प्रकाश हिलम यांच्या पाठीत मारून गंभीर दुखापत झाली असून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असता फिर्यादी /विमल प्रकाश हिलम, वय वर्ष ४० राहणार निळज, आदिवासी वाडी यांनी ११ जुलै रोजी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पुढील तपास दाखल अंमलदार कोळेकर माणगाव पोलीस ठाणे/तपासी अधिकारी- पोहया / ७९३ दोडकुलकर माणगाव पोलीस करत आहेत