जेईई मेन्स मध्ये नागपूरच्या अद्वय क्रिष्णाने मारली बाजी
🖋अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351
नागपूर,
आज जेईई मेन्स २०२२ च्या पहिल्या सत्राचा निकाल घोषित झाला आहे. यात नागपूरचा अद्वय क्रिष्णा हा विद्यार्थी महाराष्ट्रातून पहिला आला आहे. त्याला ९९.९९ टक्के मिळाले आहे. राज्यनिहाय निकालामध्ये महाराष्ट्रातून अद्वयने बाजी मारली आहे. अद्वयला या परीक्षेत 300 पैकी 291 गुण मिळाले आहेत. तर अनुज चांडक हा विद्यार्थी ९९.९८ टक्के गुण मिळवून नागपूरचा दुसरा टॉपर आहे. जेईई या परीक्षेची अंतिम उत्तराची यादी नुकतीच ६ जुलैला प्रसिद्ध झाली होती. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित टक्के मिळवले आहेत ते पुढील सत्रात म्हणजे दुसऱ्या दोनसाठी पात्र ठरले. दुसऱ्या सत्राची परीक्षा झाल्यानंतर एनटीए जेईई ॲडवान्स परीक्षेसाठीचा अंतिम कट ऑफ जाहीर करेल. दुसऱ्या सत्राची परीक्षा २१ ते ३० जुलै या कालावधीत होणार असून त्यानंतर ‘कौंसिलिंग’साठी ‘ऑल इंडिया रँक’ आणि ‘कट ऑफ’ जाहीर करण्यात येईल. जेईई मुख्य सत्र २ ची नोंदणी सुरू आहे. जेईई मुख्य सत्र 2 परीक्षा 21 जुलै ते 30 जुलै 2022 या कालावधीत होणार आहे.