आलापल्ली परिसरात काल रात्री 8 वाजता पासून सुरु झालेल्या पावसाने आलापल्ली तथा नागेपल्ली येथील संपूर्ण जणजीवन विस्कळीत

आलापल्ली परिसरात काल रात्री 8 वाजता पासून सुरु झालेल्या पावसाने आलापल्ली तथा नागेपल्ली येथील संपूर्ण जणजीवन विस्कळीत

आलापल्ली परिसरात काल रात्री 8 वाजता पासून सुरु झालेल्या पावसाने आलापल्ली तथा नागेपल्ली येथील संपूर्ण जणजीवन विस्कळीत
स्वप्निल श्रीरामवार तालुका प्रतिनिधि 8806516351

आलापल्ली : –  करून टाकले असून आलापल्ली आणि नागेपल्ली येथील अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने
नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, पोलीस आणि महसूल विभाग तथा सी आर पी एफ च्या मदतीने रात्री पासूनच लोकांना सुरक्षित स्थळी स्थानातरीत करण्यात यश आले आहे
सविस्तर असे की, हवामान खात्याने जिल्ह्यात आधीच तीन दिवसाचा रेड अलर्ट घोषित केला होता त्यासाठी पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांसाठी खाजगी आस्थापने साठी तीन दिवसाच्या सुट्ट्या जाहीर केल्या होत्या परंतु काल दिवसभर ढगाळ वातावरण असूनही सूचनेप्रमाणे कोणताही पाऊस पडला नाही परंतु रात्री आठ वाजता पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली यात प्रामुख्याने हत्ती नाला परिसर वार्ड क्रमांक सहा, सावरकर चौक, एटापल्ली तथा वेलदुर रोड वरील घरे, बेघर वस्ती, मोदूमाडगू, सिरोंचा पुलिया परिसर, टेकडी कॉलनी चा परिसर, एफडीसीएम वसाहतीमधील अनेक अनेक निवासस्थाने, नागेपली लक्ष्मण नाल्याजवळील परिसर, नागेपल्ली गोंड मोहल्ला, चंद्रपूर रोड वरील नाल्याजवळच्या परिसरात मोठया प्रमाणात पावसाचे पाणी शिरले, आलापल्ली आणि नागेपल्ली मिळून अंदाजे 150 ते 200 घरा हुन जास्त घरे पुराणे बाधित झाले असून यात नागरिकांचे मोठया प्रमाणात अन्नधान्य, पाळीव जनावरे, आणि घरगुती सामान चे प्रचंड नुकसान झाले आहे, पूर पीडित लोकांनसाठी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन तर्फे आदिवासी मुलांचे वस्तीगृह येथे निवारा आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनााली उपविभागीय पोलिस अधिकारी, अहेरी अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे आणि अहेरी पोलीस स्टेशन चे कर्मचारी तथा पोलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे, पोलीस आमदार उद्धव पवार, सिराज खान, नागेश यांनी रेस्क्यूब बोट द्वारे विशेष अभियान राबवून नागेपल्ली येथे पुरामध्ये अडकलेल्या 17 लोकांना सुरक्षित स्थळी बोट मधून हलवले. यामध्ये एका कुटुंबातील एक महिन्याच्या बाळाचा देखील समावेश होता. गडचिरोली पोलीस ,महसूल,तसेच एस डि आर एफ यांनी संयुक्तपणे आतापर्यंत 45 लोकांना सुरक्षितपणे हलवले आहे व बोट माध्यमातून सतरा लोकांना सुरक्षित स्थळी पोचवले आहे. पोलीस अंमलदार श्रीकांत भांडे ,ज्ञानोबा खूने आणि नितिन पाल यांनी 15 लोकांना स्वतः सुरक्षित स्थळी नेले आहे, टेकडी कालनी परिसरात पूर ग्रस्त लोकांन साठी राणी दुर्गावती विद्यालय चे मुख्याध्यापक गजानन लोंबनले, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार तसेच वेलकम फाउंडेशन आलापल्ली यांनी दोन्ही टाईम जेवणाची सोय केली, एकूण पूरपरिस्थिती पूर्णपणे नियंत्रण मध्ये आहे.