सर्पमित्राने नाग सापास दिले जीवदान
नंदवर्धन येथील घटना
शरद कुकुडकार
गोंडपिपरी शहर प्रतिनिधी
मो.न.9518727596
गोंडपीपरी तालुक्यातील
नंदवर्धन येथिल शेतकरी
चंद्रशेखर कुरवळकर यांच्या घरालगतच ढोल्यात नाग साप आढळून आला. त्यांनी या बाबतची माहिती गावातील
सर्पमित्राना दिली.
सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने नाग सापास पकडून जीवनदान दिल्याची घटना सोमवारला घडली.
नंदवर्धन येथील शेतकरी चंद्र शेखर कुरवडकर यांनी घरालगतच
जनावरासाठी चारा ठेवण्यासाठी ढोला तयार केला.
त्या ढोल्यात जनावराचे खाद्य म्हणजेच कडबा, कुटार भरून ठेवला होता.
गोंडपीपरी तालुक्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने त्यांनी शेत शिवारात जनावरे चराई साठी न नेता घरीच गोठ्यात बांधून ठेवली.
जनावराना चारा काढण्यासाठी गेले असता ढोल्यात त्यांना नाग साप दिसून आला. याबाबत माहिती त्यांनी सर्प मित्र सागर झाडे ,आभि आकाडे ,मयूर खरबनकर यांना दिली.
लागलीच
सर्पमित्र घटनास्थळी हजर झाले.
ढोल्यात पाहणी केली असता नाग साप कुटारामध्ये दळून असल्याचे दिसून येताच
मोठ्या शिताफीने सर्पमित्रानी दडून बसलेल्या नाग सापास ढोलयातुन बाहेर काढले आणि निसर्ग
मुक्त करण्यात आले.