स्वराज्य फाऊंडेशन व लाडका राजा गणेश मंडळ आलापल्ली ठरला पूरग्रस्तांनसाठी देवदूत

स्वराज्य फाऊंडेशन व लाडका राजा गणेश मंडळ आलापल्ली ठरला पूरग्रस्तांनसाठी देवदूत

स्वराज्य फाऊंडेशन व लाडका राजा गणेश मंडळ आलापल्ली ठरला पूरग्रस्तांनसाठी देवदूत

मुलचेरा ता.प्रतिनिधी महेश बुरमवार मो.न. 9579059379

पूरग्रस्तांना सकाळी ३.३०च्या सुमारास मदत
⚪अतीसंवेदनशील क्षेत्रांत मदतीसाठी कार्यकर्ते पूर्ण वेळ उभे
⚪मोदुमडगू येथील पूरग्रस्तांनसाठी दोरीच्या साह्याने नालाओलांडून जेवनाची व्यवस्था
⚪नागेपल्ली,सावरकर चौक,बजरंग चौक,येनकापल्ली,मोडूमडगू जुना आणि नवीन असे अनेक ठिकाणी जेवणाची व्यवस्था
⚪बाहेर गावातील अडकलेल्या प्रवाश्यांना बसस्टँडवर जेवणाची व्यवस्था.

आलापल्ली :- …………..*ती भयानक रात्र*
दि.१२/०७/२०२२ रोजी सायंकाळ ८वाजे पासून रिमजीम पावसाला सुरुवात झाली पावसाचा वेग हळू हळू वाढायला लागला हवामान खात्याने वर्तवल्या प्रमाणे १२ तारखेला पाऊस जास्त प्रमाणात होऊ लागला लोक हा विषय एवढ्या गंभीरतेने घेतले नव्हते कुठलाच पूर्वनियोजण नकरता पावसाचा जोर वाढत असताना देखील काही नाल्या जवडील परिसरातील नागरिक बिनदास्तपणे झोपी गेलेत.
त्यांना या पावसाचा अंदाज आला नाही आणि बघता बघता काही वेळेतच हळू हळू नाल्याच्या पाणी गावात शिरायला सुरवात झाली.
लाईट गेली काडकोट अंधार दुसरीकडे विजेचा कडकडाट आणी त्या विजेचा कडकडाटाच्या प्रकाशात अगदी घराच्या अंगणात आलेला पाणी हे सगळं बघत असताना अंगावर शहारे येईल अशी परिस्थिती त्या परिस्थितीत काही लोकांच्या परिवारात फक्त एक माणूस आणि त्यांचे छोटे दोन मुलं अश्या स्तिथीत तो घर सांभाळनार की आपल्या मुलांना घरात ४फिट पाणी शिरलेला. या परिस्थितीची माहिती स्वराज्य फौंडेशनच्या व आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळच्या कार्यकर्त्यांना मिडाली व लगेच सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन ईश्वरीय कार्याला रात्री ३.३०च्या सुमारास सुरवात केली.विविध भागात अडकलेल्या पूरग्रस्तांना घराबाहेर काढण्यासाठी सकाळी 6 वाजे पर्यंत सहकार्य केले व त्याना सुरक्षितस्थळी नेण्यात आले.
पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था करण्या करिता मुख्य चौकात पिंटू हॉटेल येथे स्वयंपाक तयार करण्यात आले व नागेपल्ली,मोदुमडगु,मलमपल्ली,येनकापली व इतर पुरग्रस्तभागातील नागरिकांनकरिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
बाहेर गावाला जाण्याकरिता अडकलेले प्रवाश्यांना जेवणाची व्यवस्था व त्यांना गावा पर्यंत जाण्याकरिता वाहनांची व्यवस्था करण्यात आली.
स्वराज्य फौंडेशन व आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ तर्फे मदतकार्य आता पण सुरू आहे जेंव्हा पर्यंत पूरपरिस्थिती अनुकल होत नाही तेव्हा पर्यंत सहकार्य करणार आहेत.