माणगांव तालुक्यातील गोरक्षनाथ मंदिर ढालघर येते गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न

माणगांव तालुक्यातील गोरक्षनाथ मंदिर ढालघर येते गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न

माणगांव तालुक्यातील गोरक्षनाथ मंदिर ढालघर येते गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न

✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞

माणगांव :- गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः झालिया सद्गुरू प्राप्ती “ईश्वर कृपेने घडे भक्ती” सद्गुरू तोचि ईश्वर मूर्ती” वेदशाश्त्री संगत एकनाथी भागवत! या पवित्र व पावन भूमीचे महदभाग्य म्हणून प्रत्येक पिढीला कोणीतरी महापुरुष जन्माला येऊन जडजीवांना जीव जगत जगदीशाचे सत्य ज्ञान करीत असतात.आपल्यालाही हे आत्म्यज्ञानाचे जे सत्याचे झालेले आहेत असे,विश्व् मान्य ग्रंथ गीता ज्ञानातून मानव जातीचा मन व बुद्धीत परिवर्तन घडविण्यासाठी स्वतः ची शिदोरी स्वतः नी खर्च करून ज्यांनी आपले सारे आयुष्य व्यतीत केले असे नाथ साप्रदाय चे महान तपोनिधी परम पुज्य सद्गुरु माऊली श्री बेटकर महाराज हे ही या पिढीतील एक भगवदविभूतीच अर्थात ईश्वर मूर्तिच आहेत.भगवत कृपेने भाग्यवंत शिष्यगण हो आपणास असे सद्गुरू लाभले हे आपले परम भाग्यच होय या संसार रुपी भव सागरातून पार होण्यासाठी मनुष्य योनीतच आत्मज्ञान घेता येतो इतर योनीत नाही.

एक एक योनी कोटी कोटी पेक्षा तेव्हा लागे वारा मानवाचा तेव्हा अशा या महान तपस्वी सद्गुरू माऊली च्या पादुकाचे पूजन प्रतिमा व समाधीचे दर्शन घेण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या आत्म ज्ञानाची स्मुर्ती जागविण्यासाठी आज आपल्या समोर तसे आचरण करण्यासाठी गुरु पौर्णिमा सारख्या पवित्र दिवसाला आपल्या ऋषीं मुनींनी ठरवून शिष्य गणासाठी गुरु पौर्णिमा महापर्वनीच दिला आहे.

काय वानू मी या सद्गुरूचे उपकार मज निरंतर जागविती ज्या सद्गुरूनी आपल्याला परम स्त्री माते सन्मान,दारू, मटका, जुगार बंदीची शपथ देऊन संसारची दूर्दशा करणाऱ्या व्यसनापासून दूर केले नाम व ज्ञानरुपी आत्मज्ञानाचा बोध करून दिव्य साधना दिली अशा सद्गुरू माऊलीची कृतज्ञता व्यक्त करण्याचं हा आज गुरु पौर्णिमा दिवस आहे अशी संधी चुकवू नये आपल्या मन व बुद्धीला जागविणाऱ्या सद्गुरू माऊलीच्या ध्येय व ज्ञानरुपी विचाराची अमृतधारा प्राशन करण्यासाठी आपण आपल्या कुळासाह दर्शन घेण्यासाठी यावे.गुरुपौर्णिमा निमित्त आज दि १२ जुलै रोजी गोरक्ष मंदिर ढालघर येते सायंकाळी ६ वाजल्यापासून यज्ञ विधी महाआराती व तीर्थ प्रसाद त्याच प्रमाणे हरिजगार श्री नाथ साप्रदाय भजन मंडळ व नवीन नामधारक दिक्षाविधी त्याच प्रमाणे रायगड भूषण प पु गुरवर्य दादा महाराज शिंदे याचे गुरु पौर्णिमा महात्म्य निमित्त प्रवचन करण्यात आले या गुरु पौर्णिमा निमित्त माणगांव तालुक्यातील त्याच प्रमाणे इतर परिसरातील शिष्य गण हजारो च्या संख्येने उपस्थित होते.