स्वराज्य फाउंडेशन व लाडका राजा गणेश मंडळ संस्थांचा सत्कार 

51

उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर साहेब यांनी केले स्वराज्य फाउंडेशन व लाडका राजा गणेश मंडळ संस्थांचा सत्कार 

महेश बुरमवार

मुलचेरा ता.प्रतिनिधी 

मो.न.9579059379

१५ जुलैला अहेरी येथील पोलीस मुख्यालय कार्यालयात पूरग्रस्तांच्या बचाव कार्यात सहकार्य केलेल्या योद्धांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आले यात आलापल्ली येथील स्वराज्य फाउंडेशन संस्त्थएचा सत्कार करण्यात आला.

माघील आठवड्या भरापासून होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका अहेरी उपविभागातील अनेक गावांना बसला यात काही लोकांना आपले जीवपण गमवावे लागले अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले लोकांचे घर कोसडले पाडीव प्राणी पुरात वाहून गेले नागिरकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.अश्या भयावह परिस्थितीत लोक आपल्या परिवारासह घरीच सुरक्षित राहणे उचित समजत असताना स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य मात्र मध्यरात्रीच त्या भयानक परिस्तिथीत नागरिकांच्या मदतीला धावलेत. सकाळी ३.३०वाजे पासून लोकांना पुरातुन काडन्यासाठी बचाव कार्य सुरू केले त्या नंतर तो संपुर्ण दिवस पूरग्रस्तांना मदत करत राहिले पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था स्वराज्य फाउंडेशन तर्फे करण्यात आले.

हे सगळं बघता उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर साहेब स्वराज्य फाउंडेशनच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आपल्या कार्यालयात बोलावून स्वराज्य फाउंडेशनच्या सदस्यांचा सत्कार केले व स्वराज्य फाऊंडेशन करत असलेले कार्य खूप अभिमानास्पद आहे अश्या सामाजिक संस्थाची गरज पुन्हा आहे असे बोलत या पुढे स्वराज्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्यात पोलीस विभाग नेहमी सोबत राहील असे सांगितले.

स्वराज्य फाउंडेशनने उपविभागीय पोलिस अधिकारी साहेबांन तर्फे करण्यात आलेले सत्कार हे आम्हाला सामाजिक कार्यात काम करण्यासाठी बळ देणारे आहे असे बोलून पोलीस विभागाचे जाहीर आभार मानले.