वाशिम जिल्ह्यातील खासगी नळाच्या पाणी नमुन्याची तपासणी, सार्वजनिक पाण्याचे ३३ नमुने अयोग्य

53

वाशिम जिल्ह्यातील खासगी नळाच्या पाणी नमुन्याची तपासणी, सार्वजनिक पाण्याचे ३३ नमुने अयोग्य

अजय उत्तम पडघान

मो: 7350050548

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांत वाढ होते. त्यामुळे ग्रामीण भागातील सार्वजनिक जलस्रोतासह खासगी नळ कनेक्शनद्वारे होणाऱ्या पाण्याची तपासणी केली जात आहे. गत महिन्यात प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील २८८ नळ कनेक्शनचे नमुने तपासले असता सर्व योग्य आढळून आले.

खासगी नळ कनेक्शनद्वारे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याच्या या तपासणीसाठी संबंधितांकडून दुर्लक्ष होते. त्यामुळे ज्याठिकाणी खासगी नळ कनेक्शनद्वारे पिण्याचे पाणी सोडले जाते, अशा सर्व पाणी नमुन्यांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना दिल्या होत्या.

अतिसार पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे ग्रामपंचायतींना सर्व शासकीय व खासगी जलस्रोताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. गत महिन्यात प्राप्त झालेल्या पाणी नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून, सर्व नमुने योग्य आढळले आहेत. वाशिम प्रयोगशाळेत १६१, मालेगाव प्रयोगशाळेत १२७ पाणी नमुने तपासण्यात आले.

पावसाळ्यात दुषीत पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते त्यामुळे ग्रामपंचायतीने सार्वजनिक जल स्त्रोतासह खासगी नळाचे पाण्याचे नमूने तपासणी साठी प्रयोग शाळेकडे सादर करण्याचा सूचना आरोग्य् विभागाने दिल्या आहेत.