नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून तात्काळ मदत द्या, भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

बाबा मेश्राम

सावली तालुका प्रतिनिधी

 मो: 7263907273

सावली तालुक्यात मागील आठ दिवसापासून संततधार पाऊसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली. तर शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचेकडे सावलीचे तहसीलदार यांचेमार्फत निवेदनातून केलेली आहे. 

सावली तालुका शेतीप्रधान तालुका म्हणून जिल्ह्यात ओळखला जातो. तालुक्यात धान पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक असून तालुक्‍यातील शेतकरी शेतीवरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु मागील आठ दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यात अनेक घरांची पडझड झालेली आहे. सावली साज्यात 20 तर तालुक्यात 130 घरांची पडझड झाली, आणि कुटुंबाचा राहण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. तर शेतकऱ्यांचे शेतीत पेरणी केलेले बीज अतिपावसामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे. याची दखल घेत सावली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसिलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदनद्वारे नुकसान ग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत पुरविण्याची मागणी केलेली आहे. 

यावेळी तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, जिल्हा महिला उपाध्यक्ष निलम सुरमवार, शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, महिला शहर अध्यक्ष गुडी सहारे, कृष्णा राऊत, राकेश गोलेपल्लिवार, नगरसेवक शारदा गुरनुले, प्रसाद जक्कुलवार, अनंत येलचलवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here