चाळीसगाव ST डेपोचा गलथान कारभार, चालक आणि वाहक स्वतःला समजत आहेत गाडीचे मालक

50

चाळीसगाव ST डेपोचा गलथान कारभार, चालक आणि वाहक स्वतःला समजत आहेत गाडीचे मालक

तन्मय सुनिल जैन

सोयगाव तालुका प्रतिनिधी

मो: 7588165274

मागील 20 वर्षापासून नित्य नियमाने दररोज चाळीसगाव डेपो ची गाडी MH20BL2282 ही चाळीसगाव – गोदेगावं ही गाडी सकाळी 10 च्या सुमारास बनोटी येथे आली. सर्व पाचोरा सोयगाव डेपोच्या गाड्या या गावात जात असून फक्त हीच गाडी गावात का जात नाही असा जाब विचारला असता अरेरावी करत चालक व वाहक स्वतःला गाडीचे मालक समजून गावातील सरपंच श्री मुरली बापू तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री मुकेश जैन तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश संयोजक श्री तन्मय सुनिल जैन यांच्यासोबत उद्धट भाषेत बोलू लागले. सर्वांनी हात जोडून विनंती केली असता गाडी गावात जाईल तर माझ्या अंगावरून जाईल अन्यथा जाणार नाही असे उपरोधिक टीका केली. व गाडीसमोर लोटांगण घातले. 

व शिवीगाळ केली.चाळीसगाव डेपो ला फोन केला असता तेथूनही चालक व वाहक यांचे समर्थन करण्यात आले. व चालक व वाहक यांचे नाव विचारले असता आम्ही सांगणार नाही असे सुद्धा सांगण्यात आले. हा मनमानी कारभार बंद करून 

चालक व वाहक यांचे निलंबन करण्यात यावे व त्यांना धडा शिकवला जावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.