भरधाव कारचा समोरील टायर फुटल्याने, कार ट्रेलरवर आदळली.

58

भरधाव कारचा समोरील टायर फुटल्याने, कार ट्रेलरवर आदळली.

नागपूर येथून अमरावतीकडे जाणा-या एम. एच.30 ए. झेड. – 2692 क्रमांकाच्या भरधाव कारचा तळेगाव नजीकच्या सत्याग्रही घाटात अचानक समोरील टायर फुटला. त्यामुळे कार नियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येणाºया सी.जी. 04 जे. बी. 3122 क्रमांकाच्या टेलरला धडकली. या अपघातात कार रस्त्याच्या खाली फेकल्या गेल्याने कारचा चुराडा झाला. या कारमधून बाप-लेक प्रवास करीत होते. कारची अवस्था पाहून कुणीही वाचले नसेल असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला.

वर्धा:- तळेगाव भरधाव कारचा समोरील टायर फुटल्याने अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येणा-या ट्रेलरवर धडकली. यात कारचा चुराडा झाला असून दैव बलवत्तर असल्याने कारमधील बाप-लेक सुखरुप बचावले. हा अपघात नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
नागपूर येथून अमरावतीकडे जाणा-या एम.एच.30 ए. झेड. 2692 क्रमांकाच्या भरधाव कारचा तळेगाव नजीकच्या सत्याग्रही घाटात अचानक समोरील टायर फुटला. त्यामुळे कार नियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येणाºया सी.जी. 04 जे. बी.3122 क्रमांकाच्या टेलरला धडकली. या अपघातात कार रस्त्याच्या खाली फेकल्या गेल्याने कारचा चुराडा झाला. या कारमधून बाप-लेक प्रवास करीत होते. कारची अवस्था पाहून कुणीही वाचले नसेल असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. पण, दोघांनाही जखमी अवस्थेत कारमधून बाहेर काढून उपचाराकरिता दुसºया वाहनाने नागपूरला हलविले. त्यामुळे जखमींचे नावे कळू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच तळेगांव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.