माणगाव, निजामपूर येथे गाडी धुण्याकरता गेलेल्या व्यक्तीचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू
दिपक दपके
माणगांव शहर प्रतिनिधी
मो: 9271723603
मिळालेल्या माहितीनुसार दुर्गाप्रसाद अलकी यादव ,वय १९ वर्ष संध्या रा. निजामपुर ,ता. माणगांव जि. रायगड, मुळ अकरी कुहिया, रा. पो. गलदा, ता. तुळशीराम जि. बलरामपुर, राज्य- उत्तरप्रदेश हा फिर्याद देणार / रामविलास पलटु गौतम वय- ४८वर्षे, व्यवसाय भंगार व्यवसाय माणगांव संध्या रा. आम्रपाली नगर, निजामपुर ता. माणगांव जि. रायगड मुळ रा. सकरीकुहिया, पो.मलदा, ता. तुळशीराम जि. बलरामपुर, राज्य- उत्तरप्रदेश यांचा मुलगा रुपेश याचे अपना टु व्हीलरचे गॅरेजचे पाठीमागे दुपारी १२.०० वा. चे सुमारास दु व्हीलर गाडी धुण्यासाठी गेला असता तेथे त्याला गाडी धुत असताना इलेक्ट्रीक शॉक लागुन तो खाली पडला.
बेशुध अवस्थेत झाला त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन तो मयत झाल्याचे घोषित केले पुढील तपास /तपासिक अंमलदार – सहा फौज, भोजकर माणगाव पोलीस ठाणे. स.पो.नि.श्री.लहांगे सर माणगांव पोलीस ठाणेमपोना / १९४ धनावडे माणगाव पोलीस ठाणे करीत आहेत.