रोह्यामध्ये जनावरांचा संशयी मृत्यू

45

रोह्यातील पशूंच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल:-पशुधन विकास अधिकारी डॉ. सांगळ

 

सचिन पवार 

माणगाव तालुका प्रतिनिधी

मो: ८०८००९२३०१

माणगांव :- रोहा तालुक्यातील मौजे पांगळोली येथील पशुपालकांनी पशुसंवर्धन विभाग,रोहा यांच्याशी दि.17 जुलै 2022 रोजी संपर्क साधुन गावातील पशू मृत पावल्याचे कळविले.

ही माहिती मिळताच रोहा पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी त्वरित दाखल झाले. प्रथमदर्शी घटनास्थळी 3 पशूंचे मृतदेह निदर्शनास आले. मात्र संध्याकाळची वेळ झालेली असल्याने व पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याकारणास्तव या मृत पशूंचे शवविच्छेदन दि.18 जुलै रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पशूंच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावरच लक्षात येईल, असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अक्षय सांगळे यांनी कळवि!ले आहे.

 तसेच गावातील पशुपालकांना मार्गदर्शन करुन इतर आजारी पशूंची तात्काळ तपासणी करून त्या पशूंवर आवश्यक उपचारही करण्यात आले.

मात्र या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.