नाल्यांना पुर येऊन अनेक घरांमध्ये पाणी घुसून घरातील सामानाची मोठया प्रमाणात नुकसान, आमदार राजुभाऊ पारवे यांनी केेली पाहणी
त्रिशा राऊत
नागपुर ग्रामीण प्रतिनिधि
मो ९०९७८१७९५३
नागपूर.नांद. काल झालेल्या अतिवृष्टी मुळे भिवापूर तालुक्यात 220 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पुर येऊन अनेक घरांमध्ये पाणी घुसून घरातील सामानाची मोठया प्रमाणात नुकसान झाली आहे तर काही घरे पडली आहे .
आज भिवापूर तालुक्यातील नांद, चिखलापार, व खापरी या गावांना भेट दिली व परस्तिथीची पाहणी करून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. नांद येथील जवळ जवळ 20 कुटुंबाचे फार नुकसान झाले आहे त्या 20 कुटुंबाना लवकर सावरण्यासाठी मी माझ्या कडून 1 लक्ष रुपयाची मदत केली.
तसेच भिवापूर तालुक्यातील शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचे सुद्धा तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश समंधीत अधिकाऱ्यांना दिले.