सतत होणाऱ्या पावसामुळे मांडवा छोटा पुलांचे वरील सिमेंटचे पापुद्रे गेले वाहून
त्रिशा राऊत
नागपूर ग्रामीण प्रतिनिधि
मो ९०९६८१७९५३
दिनांक 16/07/2022 रोज शनिवारला भिवापूर तालुक्यातील शिवापूर, सरांडी, मांडवा, सोमनाडा, जवळी, धापर्ला डोये महल्लारपूर, टाका, धामणगाव विदयामंदिर, पांढरवानी येथे समाधान शिबीर व विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम माझ्या अध्यक्षतेखाली पार पडले.
या वेळी गावातील नागरिकांशी हितगुज व्हावी त्याच्या समस्याचे निराकारन तिथेच व्हावे या उद्देश ठेवून समाधान शिबिराचा माध्यमातून लोकांच्या समस्या चे निवारण करण्याचा पर्यंत केला.
तसेच सतत होणाऱ्या पावसामुळे मांडवा छोटा पुलांचे वरील सिमेंट चे पापुद्रे वाहून गेले होते त्या पुलावर बस जाण्यासाठी त्रास होता त्या ठिकाणी तात्काड भरन भरून रस्ता जाण्यासाठी सुरु झाला व ज्या ठिकाणी छोटे पूल आहे त्या ठिकाणचे नवीन पुलांचे प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. तसेच अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तर तहसीलदार यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच बऱ्याच गरजू नागरिकांचे घर मोडकडीस आले असून अजून पर्यंत त्यांना घरकुल योजने चा लाभ मिळाला नाही ता करीता BDO यांना गावा गावात जाऊन पाहणी करण्यास सांगितले. विद्यार्थी यांनी बस वेळेवर येत नाही या अडचणी मांडल्या असता शाळेचा वेळे नुसार बस पोहचावी हा आदेश डेपो मॅनेजर ला दिला.