माणगाव /अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
*✍ दिपक दपके ✍*
*माणगांव शहर प्रतिनिधी*
*मो, 9271723603*
माणगाव मुंबई गोवा हायवे रोड मच्छी मार्केट समोर माणगाव येथे दिनांक .२१/०७/२०२२ रोजी सकाळी १०.३० वा. चे सुमारास रोहीणी उदय नांदे, १)सचिन चंद्रकांत गोळे, वय ४५, २) स्वाती राकेश कळमकर, व्यवसाय गृहीणी, रा. मु.पो होडगांव कोंड ता. माणगांव जि. रायगड,हे मुंबई गोवा हायवे रोडने कोर्टाकडे चालत जात असताना काळ नदीचे अगोदर मच्छी मार्केट येथे १)महेद्र शंकर मोरे, २) सुरेश नथुराम शिगवण रा. मु.पो होडगांव कोंड ता.माणगांव यांनी तक्रारदार यांना अश्लिल शिवीगाळी करुन तक्रारदार रोहीणी उदय नांदे, यांचे अंगचवटी येवून रोहीणी नांदे, यांचा हात पकडुन रोहिणी यांना शिवीगाळी करून व सोबत असलेले सचिन चंद्रकांत गोळे, आणि स्वाती राकेश कळमकर, यांना हि शिवीगाळी करुन जिवे मारण्याची धमकी दिली सदर तक्रारदार यांनी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून दाखल अंमलदार – पोहवा / ७०९ कोळेकर / तसेच तपासी अधिकारी/ मपोसई/ पाटील माणगाव पोलीस ठाणे करत आहेत