वाशीम जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

वाशीम जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

वाशीम जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान ✍
🪀 7350050548 🪀
वाशीम/वाशिम

जिल्ह्यातील बेरोजगार यांना नोकरी/ रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाच्या वतीने शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालेगांव येथे २५ जुलै रोजी सकाळी १० ते ते दुपारी ४ वाजेपर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्राध्यान्याने आयटीआयचे (सर्व ट्रेडस्) आणि इयत्ता १० वी, १२ वी, पदवीधर (कला/वाणिज्य/ विज्ञान), अभियांत्रिकी पदवीधर, इंजिनिअरींग डिप्लोमा (सर्व शाखा) इत्यादी शैक्षणीक पात्रता असणारे उमेदवार त्यांची वयोमर्यादा १८ ते ३८ दरम्यान असावी. याच युवक-युवती उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवून विविध प्रकारच्या पदनामांकरीता २०० पेक्षा जास्त पदसंख्येकरीता भरती होणार आहे. या कंपन्यांमध्ये रोजगार मिळविणाऱ्या उमेदवारांना बस व कॅन्टिन ची मोफत व्यवस्था असून मासिक मानधन अंदाजे १० ते १२ हजार रुपये राहणार आहे.

जिल्हयातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे. तसेच ऑनलाईन पध्दतीने सुध्दा या जिल्हा रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाचे श्री. उगले भ्रमणध्वनी क्र. ७८७५७९८६८४ श्री. भोळसे भ्रमणध्वनी क्र. ९७६४७९४०३७ यांचेशी संपर्क साधावा.✍