सोयगाव बस आगाराचा पुन्हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

सोयगाव बस आगाराचा पुन्हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

सोयगाव बस आगाराचा पुन्हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

प्रवीण तायडे✍
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी

सोयगाव : – जगप्रसिद्ध अजिंठा लेणी मध्ये दि.२४ वार रविवार रोजी निसर्गरम्य वातावरण, वाहणारे धबधबे लेण्या बघण्यासाठी सकाळी ९:०० वाजेपासून येणाऱ्या पर्यटकांनामध्ये वाढ होताना दिसून आली.मात्र सोयगांव बस आगारातील फक्त बोटावर मोजण्या इतक्या ६ बसेस धावताना दिसून आल्या.जोरदार पाऊस चालू असताना हजारोंच्या संख्येने पर्यटकांना अपूर्ण बस सेवा असल्याने अजिंठा लेणी टी. पॉईंट येथील बसस्थानकावर भर पावसात आपल्या परिवारास आलेल्या पर्यटकांना तासभर ताटकळत उभे रहावे लागले.कारण बस कमी प्रमाणात होत्या व फेऱ्या पण कमी प्रमाणात होत्या.काही पर्यटकांजवळ छत्री नसल्यामुळे आपल्या चिमुकल्या लहान मुलांना भिजत असतांना हे बघून काही पालकांनी चालक,वाहक यांना जाब विचारला की, आम्ही १ तासापासून लाईनमध्ये उभे आहोत गर्दी भरपूर वाढत आहे. जोरदार पाऊस पडत आहे.आमच्याकडे छत्री पण नाही बस कमी असल्यामुळे आम्ही अजून किती वेळ भर पावसात उभे राहणार?.तेव्हा चालक म्हणाले की, साहेब आमच्या आगार प्रमुख यांनी फक्त ६ बस चालवायला दिल्या आहेत आम्ही काय करणार! अशी माहिती चालक यांनी पर्यटकाला दिली.फर्दापुर येथील एका पत्रकारांनी ग्राऊंड रिपोर्ट घेऊन जिल्हा वाहतूक नियंत्रण अधिकारी अरुण सिया यांना फोन करून सांगितले की, दोन दिवसापूर्वी सुद्धा बंगळरू येथील एका ग्रुपला बस उशिरा आली होती 1 तास ताटकळत उभे राहावे लागले होते. मनस्ताप सहन करावा लागला होता. त्याची वृत्तपत्रा मध्ये बातमी पण प्रसारित झाली होती. सविस्तरपणे माहिती दिली.तेव्हा सोयगांव आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी दुपारी १:०० वाजता ४ बस पाठवण्यात आल्या. व फेऱ्या पण जास्त प्रमाणात वाढवण्यात आल्या. रिमझिम पाऊस चालू असल्याने संध्याकाळ पर्यन्त ३९०० पर्यटकांनी भेट दिली. आलेल्या हजारो पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणात व भर पावसात फोटो टिपण्याचा आनंद घेता आला.फर्दापुर पोलीस स्टेशनचे दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक, डी बी. वाघमोडे, कोळी,पोलिस कर्मचारी तैनात होते.