राजुरा येथे अवैध शस्त्रसाठा जप्त
पोलिसांनी घातपाताची शक्यता मोडीस काढली.
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 88308573
राजुरा,: – राजुरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सकाळी गस्तीवर असलेल्या पोलीस चमूला सोमनाथपूर वार्ड येथील तीघानी बिहार राज्यातून घातक शस्त्र आणले असून भविष्यात काहीतरी मोठी घटना घडण्याची शक्यता आहे अशी गुप्त माहिती प्राप्त होताच राजुरा पोलीस गस्ती पथकाने या माहितीच्या आधारावर तात्काळ वरिष्ठांना माहिती कळवली व त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. व्ही. दरेकर, पोलीस उप निरीक्षक हिराचंद गव्हारे, नापोशी नागोराव भेंडेकर, संदीप बुरडकर, पोलीस शिपाई रामा भिंगेवाड यांच्या चमूने संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्यांच्याकडे एक पिस्तोल, दोन देशी कट्टे, स्टील तलवार तसेच चक्र असलेले एक घातक शस्त्र असल्याचे कबूल केले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी लावज्योत सिंग हरदेव सिंग देवल वय 18 यांच्यासह विधीसंघर्ष बालकाला अपराध क्रमांक 304 / 22 अंतर्गत आर्म ॲक्ट च्या कलम 3, 4, 25 अन्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली. राजुरा तालुक्यात व शहरात मागील अनेक दिवसांपासून छोट्यामोठ्या चोरीचे प्रकार सुरू असून अवैध गो तस्करी, भंगार चोरी, रेती तस्करी, जुगार, अमली पदार्थ विक्री, ओव्हरलोड वाहतूक, ट्रीपलशीट वाहन चालवणे, विना नंबर प्लेट च्या गाड्या, स्टंट मारणारे तरुण, मोठमोठ्याने आवाज करीत जाणाऱ्या गाड्या, मोबाईल, दुचाकी चोरी, चारचाकी गाड्याची नासधूस असे अनेक प्रकार सहास सुरु असून त्याकडे होतं असलेले दुर्लक्षामुळे अश्या प्रकारच्या गुन्ह्यात आरोपीची हिंमत वाढत आहे. राजुरा तालुक्यात मोठया घटना होण्यापूर्वीच पोलीस विभागाने वेळीच योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.