चिमूर येथे यावर्षी शहीद स्मृतीदिन सोहळाची जंयत तयारी

चिमूर येथे यावर्षी शहीद स्मृतीदिन सोहळाची जंयत तयारी

चिमूर येथे यावर्षी शहीद स्मृतीदिन सोहळाची जंयत तयारी
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड–आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर तालुक्यातील ग्राम पंचायत सभागृह नेरी येथे दि. १६ ऑगस्ट ला चिमूर क्रांतिभूमीत संपन्न होणाऱ्या ‛शहीद स्मृतिदिन सोहळा २०२२’ निमित्त कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात बैठक पार पडली.

सदर बैठकीत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी शहीद स्मृतिदिन सोहळा २०२२ च्या तयारी व नियोजनाविषयी चर्चा करून बैठकीला उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. श्याम हटवादे, भाजपा तालूकाध्यक्ष राजू पाटील झाडे, एकनाथ थुटे, रमेश कंचर्लावार, दत्तूभाऊ पिसे, कमलाकर लोणकर, महादेव कोकोडे, संदीप पिसे, विलास कोराम, पिंटू खाटीक , इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.