वाघाच्या हल्ल्यात एक ठार
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
गडचिरोली : शहरापासून १० किलोमीटर अंतरावरील दीबणा या गावामध्ये आज, मंगळवारी दुपारी जंगलात गेलेल्या एका व्यक्तीला वाघाने ठार केले. मृताचे नाव नीलकंठ मोहुरले (५२) असून ते लाकडे तोडण्याकरिता जंगलात गेले होते.
वाघाने हल्ला केल्याची माहिती मिळताच वन विभागाची यंत्रणा आणि पोलिस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचलेले होते. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठवण्यात आलेला आहे.
वन विभागातर्फे जंगलात जाण्याकरिता वारंवार मनाई असताना सुद्धा लोकांनी घर कामासाठी लाकूड आणण्याकरिता, सरपण तोडण्याकरिता व अनेक प्रकारच्या रानभाज्या आणून विकण्याकरिता जंगलात जाणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे आता वाघांचे हल्ल्यापासून लोकांचे संरक्षण कसे करावे, अशा प्रश्न वन विभागासमोर उभा ठाकला आहे.