जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या
चित्ररथाचा शुभारंभ
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीवरून जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज २६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या चित्ररथाचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी निलेश ठोंबरे, तांत्रिक कृषी अधिकारी एस. एस. मकासरे व कृषी विमा कंपनी ऑफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक सोमेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती
आजपासून 30 जुलैपर्यंत तीन चित्ररथ जिल्ह्यातील काही गावात जाऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करणार आहे. या चित्ररथावर पीक विमा योजनेची माहिती लावण्यात आली आहे. ऑडिओ जिंगल्स, योजनेचे पॉम्लेट्स आणि भित्तीपत्रकाच्या माध्यमातून माहिती गावपातळीवर शेतक-यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
चित्ररथामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी 31 जुलैपर्यंत पिक विमा काढण्यास प्रोत्साहित होतील.✍