कोकण रेल्वे ला कोलाड व इंदापूर येते थांबा मिळण्याची ग्रामस्थ प्रवासाची मागणी
✍ सचिन पवार✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞
माणगांव :-कोकण रेल्वे स्थापने पासून सदर पॅसेजर गाडी ही कोलाड ला थांबायची मात्र सध्या ही ट्रेन थांबत नसल्याने प्रवासाची गैरसोय होत आहे. कोलाड हे महत्वाचे स्थानक आहे. मुंबई गोवा राष्टीय महामार्गाला लागून असल्यामुळे प्रवासी वर्ग यांना अत्यंत सोयीस्कर पडत आहे. कोकण रेल्वेसाठी स्थानिक लोकांनी व शेतकऱ्यांनी आपली जागा दिली आहे, असे असताना सुद्धा कोलाड स्टेशनला कोविड नंतर सुरु झालेल्या पॅसेजर ट्रेन ही कोलाड स्टेशनंला थांबत नाही हिच परिस्थिती इंदापूर स्टेशनं ची असल्याची प्रवासात चर्चा होत आहे.
कोकण रेल्वेची पॅसेजर गाडी कोलाड व इंदापूर स्टेशनंला थांबत नसल्याने मुबंई कडून गावाला येणारे त्याच प्रमाणे गावाकडून मुंबई कडे जाणारे प्रवासाची गैरसोय होत आहे. त्यामुळे कोकण विभाग प्रशासन व खासदार सुनीलजी तटकरे यांनी जातीपूर्वक लक्ष देऊन कोलाड व इंदापूर स्टेशनं ला ज्याप्रमाणे पूर्वी थांबा मिळत होता त्याप्रमाणे आता ही थांबा मिळावा अशी मागणी ग्रामस्थ प्रवासाची आहे.