हिवरखेड गावातील पिण्याचे पाणी अस्वच्छ असून सुद्धा ग्रामपंचायत तसेच प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष
✍ *हर्षल राजेंद्र पाटील* ✍
📰 *मोर्शी तालुका प्रतिनिधी* 📰
📱8600650598 📱
मोर्शी ( हिवरखेड ) : – मोर्शी वरून अगदी जवड असलेल्या हिवरखेड गावातील पाण्याचे फिल्टर प्लॅन्टची इतकी वाईट परिस्थिती झाली आहे की पंधरा महिन्यापासून फिल्टर प्लॅन्टची कोणत्याही प्रकारची साफसफाई करण्यात आलेली नाही प्लॅन्टच्या टॅंक मध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ असून पाणी वाहून नेणाऱ्या सिमेंटच्या नालीमध्ये खूप गवत तयार झालेले आहे
पावसाळ्यामध्ये नदी नाल्याना पूर असल्यामुळे धरणामध्ये संपूर्ण गढूळ पाणी आहे व या पाण्याचा उपसा करून ते गावातील फिल्टर प्लॅन्ट वर येते व येणारे पाणी फिल्टर करून शुद्ध पाणी गावाला पुरवठा करणे आवश्यक आहे पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी येत असल्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी चा वापर करणे तसेच ब्लिचिंग पावडर चा वापर करणे आवश्यक आहे परंतु असे काही होत नाही आहे असे ग्रामपंचायत ला वेळोवेळी सांगून पण याकडे ग्रामपंचायत चे दुर्लक्ष होत आहे असा आरोप ग्रामपंचायत सदस्य , सागरभाऊ घाटोळ तसेच प्रमोदभाऊ गणोरकर ,, दिनेशभाऊ होले,, दिनेशभाऊ वाघडे,, संजयभाऊ काळे,, मंगलाताई ठाकरे,, कविताताई वासनकर,, हिवरखेड गावातील ग्रामवशी करत आहे
परिणामी गावातील नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे व त्यामुळे नागरिकांना त्वचेचे विकार तसेच पोटाचे विकार वेगवेगळ्या आजाराला बळी पडावे लागत आहे आपल्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे
ग्रामपंचायत ने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन टाकीची सफाई करावी अन्यथा आपले विरुद्ध हिवरखेड गावातील नागरिक आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही