महागाईच्या काळात सव्वा लाखात घर कसे बांधणार? घरकुलाचे अनुदान वाढवून द्या, मानोरा तालुका प्रशासनास निवेदन,

महागाईच्या काळात सव्वा लाखात घर कसे बांधणार?

घरकुलाचे अनुदान वाढवून द्या, मानोरा तालुका प्रशासनास निवेदन,

महागाईच्या काळात सव्वा लाखात घर कसे बांधणार? घरकुलाचे अनुदान वाढवून द्या, मानोरा तालुका प्रशासनास निवेदन,

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀

वाशीम : – तालुक्यातील बेघर, गरीब आणि पात्र नागरिकांना देण्यात येणारे घरकुलाचे अनुदान तोकडे आहे. विविध योजनेच्या घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. महागाईच्या काळात घराचा पायासुद्धा व्यवस्थित बांधता येत नसल्याने महागाई दराच्या अनुषंगाने घरकुल अनुदान दुप्पट करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश महाराज यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, यशवंत घरकुल योजना, शबरी घरकुल योजना अशा विविध नावाने विविध घटकांतील नागरिकांना जुन्या कुडा मातीच्या घरांच्या जागी सिमेंट काँक्रीटचे घर बांधता यावे यासाठी घरकुल मंजूर केले जाते. या अनुदानात गत काही वर्षांपासून वाढ करण्यात आली नाही.. बांधकाम साहित्यांसह मजुरीत वाढ झाल्याने मिळणाऱ्या अनुदानात घरकुलाचे बांधकाम करणे अवघड झाले आहे. त्यामुळे घरकुल अनुदानाची रक्कम दुपटीने वाढविण्याची मागणीनिवेदनाद्वारा महंत रमेश महाराज, देवराव राठोड, विशाल राठोड, अनिल महाराज यांनी केली आहे.✍