महाड एमआयडीसी मध्ये अपघातात एकाचा जागीच मृत्यू- नादुरुस्त रस्त्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच

महाड एमआयडीसी मध्ये अपघातात एकाचा जागीच मृत्यू- नादुरुस्त रस्त्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच

महाड एमआयडीसी मध्ये अपघातात एकाचा जागीच मृत्यू- नादुरुस्त रस्त्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):- महाड एमआयडीसी मधील प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनी समोर दि.२८ जुलै २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर प्रभाकर फडतरे व वर्षा फडतरे राहणार प्रभात कॉलनी महाड हे आपल्या स्कुटी वरून बिरवाडी कडून महाडच्या दिशेने जात असताना अवजड वाहनाखाली आल्याने अपघात झाला यामध्ये ज्ञानेश्वर फडतरे यांचा जागीच मृत्यू झाला तर वर्षा फडतरे जखमी झाल्या असून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलवण्यात आले अपघाताचा पुढील अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस करीत आहेत गेली कित्येक वर्षांपासून एमआयडीसी अंतर्गत असणारा रस्ता नादुरुस्त असून दरवर्षी मलमपट्टी लावण्याचे काम एमआयडीसी कडून केले जात आहे यामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिका सुरूच असून स्थानिकांकडून आंदोलन करून निवेदने देण्यात आली परंतु कोणतीही दखल एमआयडीसी व अधिकारी गांभीर्याने घेताना दिसत नाही सतत अवजड वाहनांची रहदारी असताना देखील प्रिव्ही कंपनीची वाहने रस्त्यालगत पार्किंग केली जात आहेत काही दिवसांपूर्वी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या आदेशाने एमआयडीसीतील रोड लगत पार्किंग करणाऱ्या वाहनांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असताना देखील पुन्हा कंपनीकडून उल्लंघन केले जात आहे यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून लवकरात लवकर एमआयडीसी ने रस्त्याचे काम कायमस्वरूपी करावे व रस्त्यालगतची होणारी वाहन पार्किंग बंद करावी अशा प्रकारची मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत