एनसीसी सैनिकांनी पथनाट्यातून केला ‘उज्वल भारत उज्वल भविष्य’ योजनेचा जागर

अजय उत्तम पडघान

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

मो: 7350050548

वाशिम – उर्जा मंत्रालय भारत सरकारच्या नियोजनातुन तसेच महावितरणच्या पुढाकारातुन उर्जा महोत्सव पॉवर २०४७ अंतर्गत स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या मार्गदर्शनात नियोजन भवन व मालेगाव तालुक्यातील काळामाथा येथे पथनाट्यातुन उज्वल भारत उज्वल भविष्य’ योजनेचा जागर केला.

नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, जि. प. सिईओ वसुमना पंत, महवितरण नागपुरचे प्रादेशिक संचालक अनिल डोये, केंद्र सरकारच्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे मंडळ अधिकारी पी. एस. मिश्रा यांची उपस्थिती होती. यावेळी विद्याथ्यांनी मान्यवरांसमक्ष ‘उज्वल भारत उज्वल भविष्य’ या विषयावर अप्रतिम पथनाट्य सादर करुन महावितरणच्या विविध योजनांचा जागर केला तसेच नागरीकांना विज जपून वापरण्याचा संदेश दिला.

तर काळामाथा येथील मंदिरात झालेल्या कार्यक्रमात आमदार अमित झनक, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, पंचायत समिती सदस्य रंजित घुगे, महावितरण अकोलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, महावितरण अकोला येथील पायाभूत सुविधाचे अधिक्षक अभियंता अनिल वाकोडे, केंद्र सरकारच्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे मंडळ अधिकारी पी. एस. मिश्रा, कार्यकारी अभियंता रत्नदिप तायडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे व जोगलदरीच्या सरपंच सुनिता राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. एनसीसी विद्यार्थ्यांनी यावेळी उज्वल भारत उज्वल भविष्य योजनेविषयी पथनाट्याच्या माध्यमातून गावकऱ्यांना माहिती दिली.

या पथनाट्यामध्ये तृप्ती वानखेडे, दिव्या लहानकर, रोशनी खंडारे, दिव्या पाईकराव, नंदिनी वानखेडे, प्रियंका कवळकर, जयश्री सरोदे, दिव्या पाईकराव, वैष्णवी मते, रुचिता वानखेडे, ऋतुजा राऊत, श्रद्धा भुसारी, पूजा महल्ले, शरयू आळणे, सुहानी तायडे, क्षितीज उल्हामाले, शशांक बल्लाळ, कृष्णकांत चिपडे, यश हेंद्रे, समर्थ हेंद्रे, आदित्य मते, कृष्णा कदम या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम बक्षीस देवून गौरविण्यात आले.

सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अँड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here